कोपरगावमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट? – आ. काळेंचीच कबुली!
Illegal businesses flourish in Kopargaon? – A. Kalen’s confession!
भाजप शहराध्यक्ष वैभव आढाव यांचा घणाघात
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Wed 3Dec 19.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगावातील वाढत्या अवैध धंद्यांवर आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देत व्यक्त केलेली नाराजी म्हणजे स्वतःच्या कार्यकाळातील अपयशाचीच कबुली आहे, असा आरोप भाजप शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी केला आहे.
आढाव म्हणाले की, कोपरगाव शहरात जुगार, मटका, अवैध दारू विक्री, गुटखा, ऑनलाईन बेटिंग, वाळूचोरी यांसारखे अवैध धंदे वाढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसताना, आमदार काळे यांनी अचानक निवडणूक तोंडावर हा मुद्दा उपस्थित करणे संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला.
अवैध धंद्यांत आमदार काळे यांच्या निकटवर्तीयांची नावे पुढे येत असल्याचे नमूद करत आढाव म्हणाले, “चक्री बिंगोसह झालेल्या गोळीबारापासून नुकत्याच उघडकीस आलेल्या सोने चोरीपर्यंत अनेक प्रकरणांत कोणाचे लोक असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत उलटा चोर कोतवाल को दाटे ही म्हण कोपरगावात खरी ठरत आहे.”
शहरात मारामाऱ्या करणारा पी.ए. कोणाचा? रेशन घोटाळ्यात बदनाम झालेले पदाधिकारी कोणाचे? जुगार अड्ड्यांचे संरक्षण कोण करत होते? असे सवाल उपस्थित करत आढाव यांनी काळे यांच्यावर राजकीय फायद्यासाठी उपमुख्यमंत्री पवारांकडे निवेदन देऊन दबाव तंत्राचा वापर केल्याचा आरोप केला.
नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही काळे यांनी आतापर्यंत कारवाईसाठी आवाज का उठवला नाही? नेमके निवडणूक काळातच जाग कशी आली? यामागे काही वेगळा हेतू आहे का? असा संशय असल्याचेही आढाव यांनी सांगितले.
कोपरगावच्या कायदा-सुव्यवस्थेबाबतचे गांभीर्य निवेदनातून अधोरेखित झाले असले तरी यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
Post Views:
14





