कोपरगावात आता रविवारी जनता कर्फ्यु ; बरे झाले शनिवार बदलला

कोपरगावात आता रविवारी जनता कर्फ्यु ; बरे झाले शनिवार बदलला

Janata Curfew Sunday

वृत्तवेध ऑनलाईन। 7 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 8 :33

कोपरगांव : वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोपरगाव शहरात दर शनिवारी जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता परंतु बकरी ईद शनिवारी पाळणे जनता कर्फ्यू शुक्रवारी ठेवण्यात आला होता.
प्रशासनाने पहिल्या व तिसऱ्या शनिवारी शहरातील बँका, एलआयसी इ. वित्तीय संस्था चालू असतात असे कारण देऊन भलेही जनता कर्फ्यू रविवारी केला एका अर्थाने बरे झाले आहे. कारण पुढच्या काही महिन्याच्या शनिवारांचा अभ्यास केला असता पुढच्या शनिवारी १५ ऑगस्ट, २२ ऑगस्ट गणेश चतुर्थी, १७ सप्टेंबरला घटस्थापना, २४ सप्टेंबरला खंडेनवमी, महा दुर्गाष्टमी १४ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन येणार आहे. त्यामुळे वारंवार जनता कर्फ्यू मोडावाच लागला असता, आता रविवार ठेवल्यामुळे रविवार १६ ऑगस्टला पतेती, २३ ऑगस्टला ऋषिपंचमी व २५ ऑक्टोबरला विजयादशमी अर्थात दसरा असल्यामुळे जनता कर्फ्यूचा वार बदलावा लागेल.

कोरोना विषाणू साखळी खंडित करणेकामी नागरिकांवर कारवाई करताना अडचणी निर्माण होतात.
वाढती पेशंट संख्या आटोक्यात आणण्यासाठी विषाणू साखळी खंडित करणे गरजेचे आहे. शहरातील व्यापारी, सुज्ञ नागरिक शनिवारी ऐवजी जनता कर्फ्यु वार बदलून रविवार करावा अशी मागणी करत आहे.वरील सर्व मुद्दे विचारात घेता यापुढे जनता कर्फ्यु वार रविवार असेल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी . तसेच यापूर्वी भाजीपाला बाजार आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे बाजार ओटे येथे गुरुवार व रविवार या दोन दिवशी भरत होता. यापुढे गुरुवार व सोमवार या दोन दिवशी वर नमूद ठिकाणी भाजीपाला बाजार भरेल याची नोंद शेतकरी, भाजीपाला विक्रते व नागरिकांनी घ्यावी.

घरी राहा, सुरक्षित राहा…
प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन शहर प्रशासन तहसीलदार योगेश चंद्रे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे शहर पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page