कोपरगावात शुक्रवारी, ३३ नवे रुग्ण, सध्या २०० रुग्णांवर उपचार सुरू
कोपरगाव कोरोना अपडेट : १८९५ स्वॅब तपासणी १५८५ निगेटिव्ह तर ३१० पॉझिटिव्ह, १०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुर्दैवाने ४ जणांचा मृत्यू,२०० रुग्णावर उपचार सुरू
कोपरगावात शुक्रवारी १९४ रॅपिड टेस्ट, नगर १६ तपासणी ३३ नव्या रुग्णांचा समावेश १७८ निगेटिव्ह,
वृत्तवेध ऑनलाईन। 7 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 16:23
कोपरगाव : शुक्रवारी दुपारी १९४ जणांच्या नमुन्याची रॅपिड अॅण्टिजेन चाचणी केली. यात ३२ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर १६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर नगर येथील १६ तपासण्यात एक पॉझिटिव्ह आढळून आल्याने दिवसभरात एकूण ३३ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले असल्याची माहिती कोपरगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
३३ पॉझिटिव्ह रुग्णात : रवंदा ७ ,जेऊर पाटोदा ३, टाकळी ३ ,कोळगाव थडी १,संजीवनी ३, सोनेरी २, ब्राह्मणगाव १, शिंगणापूर १,येसगाव १, पोहेगाव ,कारवाडी 3 निवारा १, अंचलगाव १, चांदेकसारे १ ,नगर लॅब १ यांचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. फुलसौंदर म्हणाले, शुक्रवारी (७ ऑगस्ट) रोजी दुपारी कोपरगाव येथे १९४ जणांचे नमुने रॅपिड अॅण्टिजेन चाचणी द्वारे तपासण्यात आले यात ३२ एॅक्टिव रुग्ण आढळून आले तर उर्वरित १६२ अहवाल निगेटिव्ह आले नगर १६ तपासणीत एक रुग्ण आढळून आले असे त्यांनी सांगितले.
(४ ऑगस्ट पर्यंत) १ हजार ८९५ कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १ हजार ५८५ तपासणी अहवाल निगेटिव्ह तर ३१० अहवाल पॉझिटिव्ह आले असून १०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुर्दैवाने ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आज कोपरगाव कोविड सेंटरमध्ये सध्या ऍक्टिव्ह २०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
कोविड सेंटर क्षमतेबाबत विचारले असता डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) म्हणाले, एस एस जी एम कॉलेज कोविड सेंटर मध्ये १८० रुग्णांची क्षमता आहे, आत्मा मलिक हॉस्पिटल येथे २०० रुग्णांची क्षमता आहे. तर मूकबधिर विद्यालयात ५० रुग्णांची क्षमता आहे. रुग्ण वाढत असले तरी रुग्ण घरी जाण्याचे प्रमाणही चांगले आहे त्यामुळे अजून तरी फारशी अडचण नाही असेही त्यांनी सांगितले.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे कोपरगाव ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही आरोग्य प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेले नियम पाळून, स्वतःची काळजी घेणे आता गरजेचे बनले आहे.
Post Views:
290