गुरुवारी दिवसभरात दहा महिन्याचे बालक व ८२ वर्षाचा वृध्दासह ६५ नवे रुग्ण

गुरुवारी दिवसभरात दहा महिन्याचे बालक व ८२ वर्षाचा वृध्दासह ६५ नवे रुग्ण

कोरोना : कोपरगावात गुरूवारी २५८ चाचण्या ६१ नव्या रुग्णांचा समावेश
१९७ निगेटिव्ह, आणखी चार रुग्णांचा समावेश एकूण ६५

वृत्तवेध ऑनलाईन। 6 Aug 2020,
By: Rajendra Salkar,20:33

कोपरगाव : गुरूवारी दुपारी २५८ जणांच्या नमुन्याची रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी केली. यात ६१ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर १९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सर नगर येथे दोन व खाजगी दवाखान्यात दोन असे एकूण ४ पॉझिटिव्ह आढळून आल्याने दिवसभरात एकूण ६५ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले
यात एका दहा महिन्याच्या बालकाचा तर ८२ वर्षाच्या वृद्धाचा समावेश असल्याची माहिती कोपरगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

६१ पॉझिटिव्ह रुग्णात : संजीवनी कॉलेज ७, संजीवनी कॉलनी १०, शिंगणापूर ४, टाकळी २ कोळगाव थडी एक नथूबाबा वस्ती एक, निमगाव एक, रवंदा एक, मंजूर एक, निवारा एक, सोनारी एक, समता नगर ३, साई लक्ष्मी नगर १, डाऊच बुद्रुक २, टाकळी फाटा १, संजीवनी गेटसमोर १, देर्डे-कोऱ्हाळे एक ,डेर्डे चांदवड एक, आपेगाव एक, कोकण ठाण१, कारवाडी एक, देवगाव १,निवारा रोड १,सांगवी भुसार दोन, येवला रोड १, चांदेकसारे१, पोहेगाव एक , शिरसगाव १, गांधिनगर १, ब्राह्मणगाव ३ यांचा समावेश असून नगर येथे दोन जण व खाजगी दवाखान्यात दोन जण आढळून आल्याने गुरुवारी दिवसभरात एकूण ६५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. फुलसौंदर म्हणाले, गुरूवारी (६ ऑगस्ट) रोजी दुपारी कोपरगाव येथे २५८ जणांचे नमुने रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी द्वारे तपासण्यात आले यात ६१ ऍक्टिव्ह  रुग्ण आढळून आले तर उर्वरित १९७ अहवाल निगेटिव्ह आले नगर व एका खाजगी दवाखान्यात तपासणी केलेले चार रुग्ण आढळून आले असे त्यांनी सांगितले.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे कोपरगाव ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही आरोग्य प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेले नियम पाळून, स्वतःची काळजी घेणे आता गरजेचे बनले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page