शब्दाला तिलांजली, सत्तेसाठी राजशिष्टाचाराला हरताळ-गोवर्धन परजणे

शब्दाला तिलांजली, सत्तेसाठी राजशिष्टाचाराला हरताळ-गोवर्धन परजणे

Renouncing One’s Word, Flouting Protocol for the Sake of Power—A Display of Arrogance

कोपरगाव बाजार समितीत आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी; उपसभापतींचा संतापजनक हल्ला

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 29Sun.18.10 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पेटली असून, उपसभापती गोवर्धन परजणे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. निवडणूक बिनविरोध केल्याचा गाजावाजा करणारेच दिलेला शब्द पाळत नसल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.

सभापती पदासाठी सहकारी गटांशी गोड बोलून सत्ता मिळवली, मात्र अडीच वर्षांनंतर पदाचा राजीनामा देण्याच्या ठरावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे परजणे यांनी स्पष्ट केले. “मी माझा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला, पण सहा महिने उलटूनही तो मंजूर केला जात नाही. सत्तेचा हव्यास एवढा की, शब्दालाही काहीच किंमत उरलेली नाही,” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

याचबरोबर, शासकीय व सार्वजनिक कार्यक्रमात पाळावयाच्या राजशिष्टाचारालाही हरताळ फासण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केला. “कार्यक्रम पत्रिकेत पालकमंत्री व माजी लोकप्रतिनिधींना योग्य स्थान न देता ज्येष्ठांचा अनादर करण्यात आला. हा प्रकार सामान्य जनतेलाही खटकणारा आहे,” असे त्यांनी ठणकावले.

चौकट :- ‘अनुपस्थिती’मागे राजकीय संगनमत?

शेतकरी भवन भूमिपूजन कार्यक्रमावर काळे गटाने बहिष्कार टाकताच आ. आशुतोष काळे गैरहजर राहिले. त्याचवेळी राजेश परजणे व नितीन औताडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचीही अनुपस्थिती ठळक ठरली. ही केवळ योगायोग की ठरवून घेतलेली भूमिका? असा सवाल उपस्थित होत असून, तालुक्यात ‘आतल्या गाठी’ची चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page