पूररेषेच्या जोखडातून कोपरगावची सुटका; विकासाला नवी गती देणार – नगराध्यक्ष पराग संधान

पूररेषेच्या जोखडातून कोपरगावची सुटका; विकासाला नवी गती देणार – नगराध्यक्ष पराग संधान

Kopargaon Liberated from the Shackles of the Flood Line; Set to Give New Momentum to Development – ​​Council President Parag Sandhan

जेडीपी आराखड्यासह पूररेषा दुरुस्तीचा निर्धार; शहराच्या वैभवासाठी ठोस पावले

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 29Sun.18.20 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : शहराच्या विकासाला वर्षानुवर्षे अडथळा ठरत असलेल्या पूररेषेच्या प्रश्नावर आता निर्णायक पाऊल उचलण्याची वेळ आली असून, नव्या जेडीपी आराखड्याच्या माध्यमातून शहरातील डीपी रस्ते दर्जेदार पद्धतीने विकसित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्याचबरोबर गोदावरी नदीमुळे निश्चित करण्यात आलेल्या पूररेषेमुळे अर्ध्याहून अधिक गाव विकासापासून वंचित राहिले आहे, ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी ठोस प्रयत्न सुरू असल्याची माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली.

कोपरगाव शहर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर वसलेले असल्याने दरवर्षीच्या पुराचा मोठा फटका बसतो. यामुळे निश्चित केलेल्या पूररेषेत गावाचा मोठा भाग अडकून पडला आहे. परिणामी, गावठाणाचा मोठा भाग विकासापासून दूर राहिला असून शहराची वाढ अक्षरशः खुंटली आहे.

मात्र, ज्या पद्धतीने सीना नदीची पूररेषा दुरुस्त करून नगर जिल्ह्यात विकासाला चालना देण्यात आली, त्याच धर्तीवर कोपरगावच्या पूररेषेच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकारकडे, विशेषतः मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा सुरू असून, लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.

“पूररेषा कमी करून शहराला विकासासाठी मोकळा श्वास देणार आणि जुन्या गावाचे वैभव पुन्हा उजळवणार,” असा ठाम विश्वास नगराध्यक्ष संधान यांनी व्यक्त केला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आता निर्णायक लढा उभा राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page