कै. कमलाबाई ठोळे यांच्या स्मरणार्थ महिलांसाठी आरोग्य शिबिर

कै. कमलाबाई ठोळे यांच्या स्मरणार्थ महिलांसाठी आरोग्य शिबिर

Health Camp for Women in Memory of the Late Kamalabai Thole

ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समितीचा पुढाकार; उद्योजक कैलास ठोळे यांची घोषणा

Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,May 8 TFir.20.20 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष कै. भागचंदभाऊ ठोळे यांच्या धर्मपत्नी कै. श्रीमती कमलाबाई भागचंद ठोळे यांच्या स्मरणार्थ महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उद्योजक कैलास ठोळे यांनी दिली.

ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समितीच्या वतीने कै. कमलाबाई ठोळे यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचाचे कार्याध्यक्ष विजय बंब यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा घेत, कै. कमलाबाई ठोळे यांच्या दातृत्वपूर्ण कार्याचा गौरव केला.

ठोळे परिवाराने शालेय विद्यार्थी, गोरगरीब गरजू रुग्ण, महापूरग्रस्त, कोरोना बाधित तसेच ग्रामीण रुग्णालयासाठी वेळोवेळी औषधे, मशीनरी व वैद्यकीय साधनांची मदत उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लायन्स क्लब व क्रेडाई संस्थेच्या माध्यमातून शहरात वृक्षारोपण, संवर्धन आणि ट्री गार्ड उपलब्ध करून देण्यात ठोळे परिवाराचा मोठा सहभाग राहिला आहे, असेही नमूद करण्यात आले.

श्रद्धांजली सभेत सुवालाल भंडारी यांनी आईवर आधारित गीत सादर करून उपस्थितांना भावूक केले. साहेबराव शिलेदार, पुरुषोत्तम पगारे, उद्योजक वाबळे, ज्येष्ठ महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी, सौ. संगीता मालकर, साहित्यिक हेमचंद्र भवर, हभप थोरे महाराज आदींनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.

यावेळी उत्तमभाई शहा, अनिल पांढरे, डॉ. भडांगे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी पवार, डॉ. अजमेरे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे सभासद व ज्येष्ठ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी कैलास ठोळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page