शेंद्रे फाटा येथे गुरव समाजाचा भव्य उपनयन सोहळा उत्साहात संपन्न
Grand Upanayan Ceremony of the Gurav Community Concluded Enthusiastically at Shendre Phata
अखिल गुरव समाज संघटना सातारा जिल्हाच्या वतीने बंधन उपनयन कार्यक्रम; समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग, मान्यवरांचे मार्गदर्शन
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,May 7 Thu.14.40 Am.By सालकर राजेंद्र
सातारा/कोपरगाव : अखिल गुरव समाज संघटना सातारा जिल्हाच्या वतीने ६ मे २०२६ रोजी शेंद्रे फाटा येथील आशा विठ्ठल मंगलम कार्यालयात बंधन उपनयन सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. समाजाच्या परंपरा, संस्कार आणि एकजुटीचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमाला समाज बांधवांनी भरघोस प्रतिसाद देत उपस्थिती लावली.
कार्यक्रमासाठी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ॲड. आण्णासाहेब शिंदे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे तसेच युवा प्रदेश कार्याध्यक्ष शिवानंद बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच उपस्थित पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला.
महिला प्रदेशाध्यक्ष श्रद्धाताई साखरे, कार्यकारी अध्यक्ष माधवीताई साळुंखे, कार्याध्यक्ष स्मिताताई क्षीरसागर, महिला जिल्हाध्यक्ष वैशालीताई पुजारी, जिल्हा कार्याध्यक्ष रूपालीताई गुरव, कराड तालुका अध्यक्ष मयुरीताई इंजेकर, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत साखरे, जिल्हा कार्याध्यक्ष रामचंद्र तावरे, युवा अध्यक्ष राहुल क्षीरसागर, खंडाळा तालुका अध्यक्ष गणेश गुरव तसेच सांस्कृतिक अध्यक्ष कृष्णराव क्षीरसागर यांची उपस्थिती कार्यक्रमाला विशेष बळ देणारी ठरली.
हरिश्चंद्र धोत्रे आणि ॲड. आण्णासाहेब शिंदे यांनी समाज बांधवांना संघटन, शिक्षण आणि सामाजिक एकात्मतेबाबत प्रभावी मार्गदर्शन केले. उपनयन विधीतील बटूंचा धार्मिक सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. बटूंची पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली, ज्यामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.
यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. समाजातील ज्येष्ठ, महिला, युवक आणि बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला संस्मरणीय स्वरूप दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगन्नाथ पुजारी, महेश गुरव, अमोल क्षीरसागर, उमेश साळुंखे, अथर्व साळुंखे आणि चैतन्य क्षीरसागर यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन श्रद्धाताई साखरे यांनी प्रभावीपणे केले.
समारोप प्रसंगी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत साखरे यांनी उपस्थित सर्व समाज बांधवांचे आभार मानत, अशा उपक्रमांमुळे समाजाची एकजूट अधिक मजबूत होत असल्याचे सांगितले.
Post Views:
3






