गुरव समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारकडे पुन्हा धाव
Gurav Community Approaches State Government Again Over Pending Demands
मंत्री माधुरी मिसाळ यांची भेट; महसूल मंत्र्यांसोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन
कोपरगाव : अखिल गुरव समाज संघटनेच्या शिष्टमंडळाने पुणे येथे राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची भेट घेऊन गुरव समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. समाजाच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधत तातडीने निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
मंत्री माधुरी मिसाळ यांच्याबरोबर चर्चा करतांना अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शितल शिंदे, ज्येष्ठ विधीज्ञ मुकूंदरावआगलावे,
गुरव समाजाच्या अनेक मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असून त्याबाबत शासन स्तरावर ठोस कार्यवाही होत नसल्याची खंत शिष्टमंडळाने व्यक्त केली. समाजाच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी शासनाने विशेष पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी मंत्री माधुरी मिसाळ यांनी शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली. पुढील दोन दिवसांत संबंधित सचिवांसोबत चर्चा करून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शिष्टमंडळात अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शितल शिंदे, ज्येष्ठ विधिज्ञ मुकुंदराव आगलावे, बाळासाहेब शिंदे, सारंग कथलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.