शिर्डीतील शिवसेना मेळाव्यासाठी खासदार संजय राऊतांचे आगमन; शिवसैनिकांकडून उत्स्फूर्त स्वागत
MP Sanjay Raut arrives for the Shiv Sena rally in Shirdi; receives a spontaneous welcome from Shiv Sainiks.
महाविकास आघाडीच्या राजकारणासह आगामी निवडणुकांवर मार्गदर्शन; जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Jun 1 Mon 15.00 Pm.By सालकर राजेंद्र
शिर्डी :महाविकास आघाडीचे राजकारण, राज्यातील बदलते राजकीय समीकरण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच आगामी राजकीय रणनीती याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यासाठी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांचे सोमवारी दुपारी २.१५ वाजता समृद्धी महामार्ग मार्गे शिर्डीत आगमन झाले.
यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. जिल्हाप्रमुख सचिन कोते, उपजिल्हाप्रमुख अस्लम शेख, तालुकाप्रमुख श्रीरंग चांदगुडे, शहरप्रमुख गगन हाडा, नानक सावंत्रे, मनोज जाधव, संदीप विघे, प्रकाश गायकवाड, ऋषिकेश खैरनार यांच्यासह शिर्डी व राहता तालुक्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यात राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, महाविकास आघाडीची भूमिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांची तयारी आणि संघटनात्मक बांधणी यावर सविस्तर मार्गदर्शन होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी दिली.
राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्याकडे शिवसैनिकांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून आगामी राजकीय दिशा स्पष्ट करणारा हा मेळावा ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Post Views:
11





