शिवसेना संपली म्हणणाऱ्यांनी कान उघडे ठेवावेत; विधानसभेपेक्षा मोठा चमत्कार घडवू!”

शिवसेना संपली म्हणणाऱ्यांनी कान उघडे ठेवावेत; विधानसभेपेक्षा मोठा चमत्कार घडवू!”

Those who claim the Shiv Sena is finished should keep their ears open; we will bring about a miracle even greater than the Assembly elections!

साखरसम्राटांच्या जिल्ह्यातही भगवा अभेद्य; कार्यकर्त्यांनी जनतेत उतरा, सत्तेचा अहंकार मोडून काढा – खासदार संजय राऊत

Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Jun 1 Mon 20.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

शिर्डी‌: शिवसेना सत्तेबाहेर असली तरी संपलेली नाही. गेली दोन दशके अहिल्यानगर जिल्ह्याने शिवसेनेला खासदार दिला असून साखरसम्राटांच्या बालेकिल्ल्यातही भगव्याची ताकद कायम आहे. राज्यातील आणि देशातील राजकारणात मोठ्या घडामोडी होणार असून आगामी काळात विधानसभेपेक्षाही मोठा चमत्कार घडेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या जिल्ह्यातील नव्या नियुक्त्यांनंतर पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने शिर्डी येथे पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख सुनील शिंदे, साजन पाचपुते, संदीप दळवी, जिल्हाप्रमुख सचिन कोते, राजेंद्र दळवी, प्रवीण महाले, जगदीश चौधरी, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

शिर्डी येथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. “शिवसेना शिल्लक नाही, संघटना संपली” असा प्रचार करणाऱ्यांना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत जनतेमध्ये मोठा आक्रोश आणि संताप असून या असंतोषाचे रूपांतर आगामी निवडणुकांमध्ये दिसून येईल, असा इशारा शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी दिला. शिर्डी येथे आयोजित शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

“अहिल्यानगर जिल्ह्याला साखरसम्राटांचा जिल्हा म्हटले जाते. मात्र गेल्या २५ ते ३० वर्षांचा राजकीय इतिहास पाहिला तर काळे, कोल्हे, विखे, परजणे यांच्यासह अनेक प्रभावी नेत्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेच्या वळचणीला आले होते. या सर्वांनी शिवसेनेचे चिन्ह घेऊन निवडणुका लढवल्या. त्यामुळे साखरसम्राटांच्या बालेकिल्ल्यातही शिवसेनेची ताकद कायम राहिली आहे,” “साखरसम्राटांच्या जिल्ह्यातही शिवसेना लढली, जिंकली आणि आजही जनतेच्या मनात आहे. सत्तेत नसल्यामुळे पक्ष संपत नाही,” असे ते म्हणाले.

राऊत यांनी कार्यकर्त्यांना गावागावांत संघटन बळकट करण्याचे आवाहन करत, शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरण्याचे निर्देश दिले. “नेतृत्व सक्षम आहे, कार्यकर्त्यांनी फक्त जनतेत राहून काम करावे. भगव्याची ताकद पुन्हा उभी राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मेळाव्याच्या प्रारंभी जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा सविस्तर आढावा सादर केला. विविध तालुक्यांतील संघटनात्मक स्थिती, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, तसेच पक्षविस्तारासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

यानंतर संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, नेवासा, राहुरी व अकोले तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, स्थानिक प्रश्न, विरोधकांची ताकद आणि पक्षासमोरील संधी याबाबतचे निवेदन संजय राऊत यांच्या समोर मांडले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी निवडक जागांवर लक्ष केंद्रित करून संघटना मजबूत करण्याची गरज पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

संपर्कप्रमुख सुनील शिंदे यांनी संघटनात्मक नियुक्त्या तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देत, निष्क्रिय पदाधिकाऱ्यांऐवजी कार्यक्षम नेतृत्व पुढे आणण्याची भूमिका स्पष्ट केली. तालुका व जिल्हास्तरावरील कार्यकारिणींच्या याद्या लवकरात लवकर अंतिम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संजय राऊत यांनी गावागावांत संघटना वाढविणे, जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष उभारणे आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. पक्षाची ताकद बूथस्तरापर्यंत पोहोचवून शिवसेनेचा भगवा अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

ज्यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी जिल्हाप्रमुख जगदीश चौधरी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच प्रास्ताविक व आभार जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी मानले

Leave a Reply

You cannot copy content of this page