AIच्या आडून वार? राज्यात खळबळ उडेल; मग ओरिजनल व्हिडिओंसाठी तयार राहा!” दडियाल यांचा विरोधकांना थेट इशारा”

AIच्या आडून वार? राज्यात खळबळ उडेल; मग ओरिजनल व्हिडिओंसाठी तयार राहा!” दडियाल यांचा विरोधकांना थेट इशारा”

“A strike launched under the guise of AI? It will cause a sensation across the state—so get ready for the ‘original’ videos!”—Dadiyal’s direct warning to the opposition.

कोपरगावात सोशल मीडिया वॉर पेटला; तुमच्या नेत्यांना घराबाहेर पडणे कठीण होईल.

Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन, Jun 3Wed 21.20 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :कोपरगावच्या राजकारणात सोशल मीडियावरील आरोप-प्रत्यारोपांच्या युद्धाने नवे वळण घेतले असून, विरोधकांकडून AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून सत्ताधारी नेत्यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप करत कलविंदर सिंग दडियाल यांनी थेट पत्रकार परिषदेतून विरोधकांना खुले आव्हान दिले आहे.
“तुम्ही AI चा वापर करून आमच्या नेत्यांची बदनामी करता. पण आमच्याकडे ओरिजनल व्हिडिओ आहेत. ते बाहेर काढले तर राज्यात मोठी खळबळ उडेल. त्यानंतर आमच्याकडे येऊन हे थांबवा, असे म्हणू नका. एकदा सुरू झाले तर सुरूच राहील,” असा इशारा दडियाल यांनी दिला.
दडियाल यांनी पुढे आणखी आक्रमक भूमिका घेत, “मी जेव्हा माझे ओरिजनल व्हिडिओ सोशल मीडियावर टाकेन, तेव्हा तुमच्या नेत्यांना घराबाहेर पडणेही अवघड होईल. त्यासाठी तयारी असेल तर मैदानात या,” असे थेट आव्हान विरोधकांना दिले.
यावेळी त्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप करताना, “तडीपार झालेल्या १६ जणांमध्ये तुमचेच लोक आहेत,” असा दावा केला. त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर AIच्या माध्यमातून विविध व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल करून राजकीय नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दडियाल यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि “ओरिजनल व्हिडिओ”चा केलेला उल्लेख आता चर्चेचा विषय ठरला आहे.
कोपरगावातील राजकीय संघर्ष आता सभागृहापुरता मर्यादित न राहता सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांपर्यंत पोहोचला आहे. दडियाल यांच्या या इशाऱ्यानंतर विरोधक काय भूमिका घेतात आणि कथित व्हिडिओंचा मुद्दा पुढे किती गाजतो, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page