धरणातील खराब पाण्याचा कोपरगावच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन — नगराध्यक्ष पराग संधान

धरणातील खराब पाण्याचा कोपरगावच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन — नगराध्यक्ष पराग संधान

Poor water quality in the dam affects Kopargaon’s water supply; citizens urged to exercise caution — Municipal Council President Parag Sandhan

धरणांनी गाठला तळ; कोपरगावच्या पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न गंभीर!

Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Jun5Fir 18.20 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठल्याने धरणातून येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता खालावली असून त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होत आहे. फिल्टरेशननंतरही काही प्रमाणात पाणी गढूळ राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे, असे आवाहन नगराध्यक्ष पराग संधान यांनी केले आहे.

पाहणीदरम्यान पाण्याची गुणवत्ता चिंताजनकरीत्या खालावल्याचे स्पष्टपणे दिसून आले. प्रशासनाकडून पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक ती प्रक्रिया केली जात असली तरी मूळ स्रोतामधूनच दूषित व गढूळ पाणी येत असल्याने फिल्टरेशननंतरही पाण्याच्या गुणवत्तेवर काही प्रमाणात परिणाम होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

विशेष म्हणजे, पाणी अधिक स्वच्छ करण्यासाठी अतिरिक्त रासायनिक प्रक्रिया केल्यास नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने अत्यावश्यक मर्यादेतच रासायनिक प्रक्रिया केली जात असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. “जोपर्यंत धरणाला नवीन रोटेशन मिळत नाही, तोपर्यंत काही प्रमाणात पाणी खराब येण्याची शक्यता नाकारता येत नाही,” अशी वस्तुस्थिती प्रशासनाने मान्य केली.

नगराध्यक्ष पराग संधान यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करताना सांगितले की, “सध्याच्या परिस्थितीत नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून, गाळून आणि स्वच्छ भांड्यात साठवूनच वापरावे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे.”

दरम्यान, नगरपरिषद प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून पाणीपुरवठा सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. मात्र, धरणातील पाण्याचीच गुणवत्ता खालावल्याने कोपरगावकरांसमोर आता “शुद्ध पाण्याचा” गंभीर प्रश्न उभा ठाकल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page