उन्हाच्या झळांनी शेती संकटात; गोदावरी कालव्यांना अंतिम आवर्तन सोडा!-आमदार आशुतोष काळे

उन्हाच्या झळांनी शेती संकटात; गोदावरी कालव्यांना अंतिम आवर्तन सोडा!-आमदार आशुतोष काळे

Scorching heat puts agriculture in crisis; release the final round of water into Godavari canals! – MLA Ashutosh Kale

फळबागा, ऊस व चारा पिकांसाठी पाण्याची तातडीची गरज;  जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी

Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Jun5Fir 18.30 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेती गंभीर संकटात सापडली असून फळबागा, ऊस व चारा पिकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामातील अंतिम सिंचन आवर्तन तातडीने सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार काळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०२५-२६ मध्ये नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी १५० टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली होती. त्यामुळे दारणा-गंगापूर धरण समूहातील प्रमुख धरणे नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण क्षमतेने भरलेली होती. मात्र, पावसात सातत्य नसल्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली असून त्याचा थेट परिणाम उभ्या पिकांवर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

गोदावरी कालव्यांना आतापर्यंत उन्हाळी हंगामात केवळ एकच आवर्तन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे गंगापूर धरणातून मिळणारे हक्काचे एक टीएमसी पाणी यंदा सोडण्यात आलेले नाही. तसेच १.८ टीएमसी क्षमता असलेल्या गौतमी-गोदावरी जलाशयातून आणि वालदेवी धरणातूनही गोदावरी कालव्यांसाठी एक थेंबही पाणी सोडले गेले नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

सध्या उन्हाळी हंगाम ३० जूनपर्यंत सुरू असताना शेतकऱ्यांना उभ्या पिकांसाठी सिंचनाची नितांत गरज आहे. धरण समूहात आवश्यक पाणीसाठा उपलब्ध असल्याने गोदावरी कालव्यांना आणखी एक आवर्तन देणे शक्य असल्याचा दावा करत शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन जलसंपदा विभागाला तातडीने निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page