एक नागरिक-एक झाड” हीच काळाची हाक! – आमदार आशुतोष काळे 

एक नागरिक-एक झाड” हीच काळाची हाक! – आमदार आशुतोष काळे 

One citizen-one tree” is the call of the times! – MLA Ashutosh Kale

हवामान बदलाच्या संकटावर वृक्षारोपण हाच प्रभावी उपाय : 

Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Jun5Fir 19.30 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन ही आजच्या काळातील सर्वात मोठी गरज बनली असून वाढते तापमान, हवामान बदल आणि नैसर्गिक असंतुलन यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपणाचा संकल्प केला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कारखाना परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

आ. काळे म्हणाले की, औद्योगिक आणि सामाजिक प्रगती साधताना निसर्गाचे आपण देणे लागतो ही भावना विसरून चालणार नाही. औद्योगिक परिसरात हरित पट्टा निर्माण झाल्यास प्रदूषण नियंत्रणास मोठी मदत होते. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करून ती जगवणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.

यावर्षी शासनाने पर्यावरण दिनासाठी ‘पृथ्वी देत असलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका; हवामानासाठी त्वरित कृती करा’ ही संकल्पना दिली आहे. या पार्श्वभूमीवर “एक नागरिक-एक झाड” ही संकल्पना प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारावी, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page