उत्तर महाराष्ट्रात संजीवनीचा ‘इंटरनॅशनल’ डंका; कोपरगावच्या शैक्षणिक विश्वात ऐतिहासिक क्षण
Sanjivani makes waves internationally in North Maharashtra; a historic moment for the educational landscape of Kopargaon.
एनबीए टीअर-वन मानांकन मिळवणारे ग्रामीण भागातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय;
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Jun10Wed 16.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे तांत्रिक शिक्षण मिळू शकते, हे केवळ सांगून नव्हे तर सिद्ध करून दाखवणाऱ्या संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने आता आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘नॅशनल बोर्ड ऑफ अक्रिडिटेशन’ (एनबीए), नवी दिल्ली या स्वायत्त संस्थेकडून संजीवनीच्या सिव्हिल, मेकॅनिकल आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागांना एनबीए टीअर-वन मानांकन बहाल करण्यात आले असून, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील हे पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे.
हे मानांकन म्हणजे केवळ प्रमाणपत्र नसून, जागतिक स्तरावरील ‘वॉशिंग्टन ॲकॉर्ड’च्या कठोर निकषांवर उतरल्याची अधिकृत शिक्कामोर्तब मानली जाते. त्यामुळे आता संजीवनीतील विद्यार्थ्यांना देशाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
संघर्षातून उभा राहिलेला दर्जाचा प्रवास
एनबीएचे मूल्यांकन हे अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील अत्यंत कठीण आणि तांत्रिक प्रक्रिया मानली जाते. प्रवेश गुणवत्ता, पीएचडीधारक शिक्षक, विद्यार्थी-शिक्षक प्रमाण, प्लेसमेंट, संशोधन, प्रयोगशाळा, उद्योगांशी करार, उच्च शिक्षणासाठी निवड होणारे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना मिळणारी उच्च पगाराची नोकरी अशा अनेक निकषांवर संस्थेची कसून तपासणी केली जाते.
संजीवनीने या सर्व निकषांमध्ये सातत्यपूर्ण प्रगती दर्शवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना तब्बल ३२ लाख रुपयांपर्यंत वार्षिक पॅकेजच्या नोकऱ्या मिळाल्याची बाब एनबीए समितीने विशेषत्वाने नोंदवली.
स्व. शंकरराव कोल्हेंच्या स्वप्नाला यशाचा मुकुट
ग्रामीण भागात जागतिक दर्जाचे शिक्षण उभे करण्याचे स्वप्न पाहणारे माजी मंत्री व संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दूरदृष्टीतून संजीवनीची वाटचाल सुरू झाली होती. २००३ पासून एनबीएच्या कसोटीवर सातत्याने उतरलेल्या संजीवनीने आता टीअर-वन मानांकन मिळवत शिक्षण क्षेत्रात नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.या यशानिमित्त आयोजित गौरव सोहळ्यात संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे यांच्या हस्ते डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, एनबीए समन्वयक, विभागप्रमुख आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चिफ टेक्निकल ऑफिसर श्री विजय नायडू उपस्थित होते.
परिणाम : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी जागतिक संधींचे दरवाजे खुले
या मानांकनामुळे संजीवनीतील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण, जागतिक कंपन्यांमधील रोजगार, संशोधन आणि तांत्रिक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संधी अधिक सुलभ होणार आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी शैक्षणिक क्रांती मानली जात आहे.
कोट
“हा सोहळा केवळ मानांकनाचा उत्सव नाही; तर तो आपल्या संस्थेच्या दूरदृष्टीचा, चिकाटीचा आणि उत्कृष्टतेच्या अखंड ध्यासाचा सन्मान आहे. महाराष्ट्रातील फक्त २० अभियांत्रिकी महाविद्यालयांना एनबीए टीअर-वन मानांकन प्राप्त आहे. त्यात संजीवनीचा समावेश ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
— अमित कोल्हे, प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी
चौकट
संजीवनीची जागतिक झेप!
सिव्हिल, मेकॅनिकल आणि आयटी या तीन शाखांना प्रतिष्ठेचे एनबीए-टीअर वन मानांकन प्राप्त; उत्तर महाराष्ट्र वमराठवाड्यातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून संजीवनीचा मान!ग्रामीण भागातून थेट आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या नकाशावर दमदार ठसा;विद्यार्थ्यांसाठी जागतिक करिअरच्या नव्या संधींचे दरवाजे खुले!
ग्रामीण मातीतून उभे राहून जागतिक शिक्षणाच्या नकाशावर ठसा उमटवणाऱ्या संजीवनीने आता स्पष्ट संदेश दिला आहे “गुणवत्तेला शहरांची मक्तेदारी नसते; जिद्द असेल तर गावातूनही जागतिक दर्जा गाठता येतो!”
Post Views:
15





