गुरव समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व ज्ञानेश्वर शिंदे मुखेडकर यांचे निधन
Dnyaneshwar Shinde Mukhedkar, a senior figure from the Gurav community, has passed away.
अखिल गुरव समाज संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष शिंदे यांच्यावर दुःखाचा डोंगर; मुखेड येथे शोककळा
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Jun13Sat 18.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :येथील ज्येष्ठ नागरिक तथा सामाजिक क्षेत्रात आदराचे स्थान असलेले ज्ञानेश्वर पुंडलिक शिंदे मुखेडकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या सतत ७७ व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने मुखेड परिसरात हळहळ व्यक्त होत असून गुरव समाजावर शोककळा पसरली आहे.
ते अखिल गुरव समाज संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष शिंदे यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
मुखेड येथील अमरधाम स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच समाजातील विविध स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शांत, संयमी आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.