संजीवनी अकॅडमी : संचालिका मनाली कोल्हे यांच्या कल्पकतेतून ऑनलाईन स्पर्धा

संजीवनी अकॅडमी : संचालिका मनाली कोल्हे यांच्या कल्पकतेतून ऑनलाईन स्पर्धा

उदंड प्रतिसाद ; प्रतिभा संपन्नतेचे प्रदर्शन

Online competition

वृत्तवेध ऑनलाईन। 13 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 15 :05

कोपरगांव: विध्यार्थ्यांसाठी स्पर्धा कोणत्याही असो, त्यातुन त्यांची प्रतिभा संपन्नता, अंगी असलेले कौशल्ये, दडलेल्या कला, इत्यादींचा अविष्कार होत असतो. यातुन पालकांना पाल्यांमधिल विभवाची (पोटेंशिअल) जाणिव होते. तसेच विद्यार्थ्यांनाही त्यांच्यातील कला, गुण, इत्यादी जोपासण्याची चालना मिळते. याच अनुषंगाने संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली कोल्हे यांच्या कल्पनेतुन संजीवनी अकॅडमी व संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या विध्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.

 

सध्या संपुर्ण जग कोरोना महामारीच्या सावटाखाली जगत आहे. संपुर्ण विश्वाची घडी विसकटली आहे. याचा मोठा फटका शैक्षणिक कामकाजावर होवुन विध्यार्थ्यांना घरातच रहावे लागत आहे. नाही वर्गातील शिक्षण , नाही मैदानावरील सांघिक अथवा वैयक्तिक खेळ, नाही मित्रांशी गप्पा गोष्टी अथवा नाही ती शाळेतील मौजमज्जा. अशा परीस्थितीमध्ये संजीवनी अकॅडमी व संजीवनी इंटरनॅशनल स्कूल विध्यार्थ्यांना तंत्रस्नेही बनवुन ऑनलाईन शिक्षणाचे धडे देत आहे. याच बरोबर ऑनलाईन स्पर्धा घेवुन त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

या स्पर्धांसाठी इ. १ ली ते ४ थीच्या विध्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य सैनिकाची भुमिका सादर करणे, शब्दांचा अर्थ सांगणे व वाक्य तयार करणे, पोस्टर मेकिंग, बिजोड कपडे घालुन वडीलांबरोबर रॅम्प वाक करणे, विज्ञानाचे प्रयोग सादर करणे, टाकावू पासुन टिकावु वस्तु बनविणे अशा विषयांवर ऑनलाईन सादरीकरण करायचे होते. तसेच प्रि प्रायमरीच्या विध्यार्थ्यांसाठी वडीलांबरोबर नृत्य सादर करणे, वृत्त निवेदक म्हणुन गमतीदार बातम्या प्रसारीत करणे, भाजीपाला, पान, फुलांचे चित्र काढणे, पाक कौशल्याबाबत सादरीकरण करणे, राष्ट्रभक्तीपर गीत सादर करणे, जादुचे प्रयोग सादर करणे अशा विषयांचा समावेश होता.

सर्व स्पर्धकांना घरातुनच मोबाईल अथवा लॅपटाॅपवर ऑनलाइन  सादरीकरण करून आधुनिकतेकडे वाटचाल करीत असल्याचे सिध्द केले. यामुळे पाल्य आणि पालक यांच्यातील नाते दृढ होण्यास मदत झाली असुन पालकांनीही आपल्या पाल्यांसाठी वेळ दिलाच पाहीजे ही अभिप्रेत असणारी गरज पुर्ण होण्यास मदत झाली.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे  कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून सर्व सहभागी विध्यार्थी व प्राचार्य सौ. सुदरी सुब्रमण्यम व शिक्षकांचे अभिनंदन केले.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page