लायन्स व लिओ तर्फे कोपरगाव शहरातील रिक्षा चालकांना किराणा वाटप
वृत्तवेध ऑनलाईन। 13 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 14 :05
कोपरगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉक डाऊनला ३ ते ४ महिना झाली रिक्षा बंद होत्या. आज जरी रिक्षा सुरू झाल्या असल्या तरी धंदा होत नाही.दररोजची कमाई मिळवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या शहरातील रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली असताना कोपरगाव येथील लायन्स व लाओ क्लबच्या वतीने ५०० रिक्षा चालकांना पंधरा दिवस पुरेल इतका किराणा मालाचे वाटप करण्यात आला आहे. नुकतेच लायन्स व लिओ क्लबच्या वतीने कोपरगाव शहरातील ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या सदस्यांना किराणा साहित्याचे वाटप पतसंस्था महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष तथा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा उर्फ काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी काका कोयटे म्हणाले करू नये संपूर्ण जगात थैमान घातलेले आहे. अनेक बळी गेले असतानाही आजही काही लोक रस्त्यावर तुटतांना बघितले की, मनस्वी चीड येते पण करणार काय ? प्रत्येकाने सामाजिक भान ठेवण्याची गरज आहे. यासाठी पथनाट्याद्वारे अजून जनजागृती करण्याची गरज आहे.
प्रशांत सरोदे म्हणाले, गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक धंदे व्यवसाय बंद आहेत. विशेषत: रिक्षा व्यवसाय अडचणीत आला आहे. या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लायन्स क्लबने त्यांना दिलेला मदतीचा हात हा कौतुकास्पद आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये कोपरगाव शहरामध्ये ज्या पद्धतीने लोकांनी पालिकाप्रशासनाला मदत केली ती पाहिल्यानंतर अशा शहरांमध्ये काम करताना मी स्वतःला भाग्यवान समजतो असे ते म्हणाले,
रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी लायन्स क्लब व व्यापारी महासंघाचे मदत केल्याबद्दल यावेळी आभार व्यक्त केले.
यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र सालकर, संचालक मल्हारी देशमुख, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, लायन्स क्लब अध्यक्ष सुधिर डागा, लिओ क्लब अध्यक्ष सौ किरण डागा,ॲड विजय गवांदे, सौ. भावना गवांदे, राजेंद्र शिरोडे, डॉ. अभिजित आचारी, माजी झेडपी सदस्य केशव भवर, उमेश धुमाळ आदिंसह लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड मनोज कडू यांनी केले, तर प्रास्ताविक लायन्स क्लब अध्यक्ष सुधीर डागा यांनी केले. आभार ॲड. विजय गवांदे यांनी मानले.





