कोपरगावात गुरूवारी ५ नवे रुग्ण, सध्या १०१ रुग्णांवर उपचार सुरू, १३ जणांना डिस्चार्ज

कोपरगावात गुरूवारी ५ नवे रुग्ण, सध्या १०१ रुग्णांवर उपचार सुरू, १३ जणांना डिस्चार्ज

कोपरगाव कोरोना अपडेट : २१७२ स्वॅब तपासणी यात ६५२ नगर,१५२० रॅपिड टेस्ट, १७८८ निगेटिव्ह तर ३७६ पॉझिटिव्ह, २७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुर्दैवाने ५ जणांचा मृत्यू, १०१ रुग्णावर उपचार सुरू

वृत्तवेध ऑनलाईन। 13 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 15:45

कोपरगाव : गुरुवारी सकाळी ३५ जणांच्या नमुन्याची रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी केली. यात ५ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर ३० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १३ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. तर ८ जणांचे नमुने नगर पाठविण्यात आले आहेत. गुरूवारी दिवसभरात ५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

५ पॉझिटिव्ह रुग्णात : साई प्रभा नगर २, श्रद्धा नगरी १, धारणगाव रोड १, जोशी नगर १ यांचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. फुलसौंदर म्हणाले, गुरूवारी (१३ ऑगस्ट) रोजी सकाळी कोपरगाव येथे ३५ जणांचे नमुने रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी द्वारे तपासण्यात आले यात ५ एॅक्टिव रुग्ण आढळून आले तर उर्वरित ३० अहवाल निगेटिव्ह आले नगर येथे ८ तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

(१३ ऑगस्ट पर्यंत) २ हजार १७२ कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १ हजार ७८८ तपासणी अहवाल निगेटिव्ह तर ३७६ अहवाल पॉझिटिव्ह आले असून २७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुर्दैवाने ५ जणांचा मृत्यू झाला आहे. आज कोपरगाव कोविड सेंटरमध्ये सध्या ऍक्टिव्ह १०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, पॉझिटिव्ह रुग्ण प्रमाण १७.३१ टक्के आहे तर बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७१.८० टक्के इतके आहे दुदैवाने मृत्यूचे प्रमाण १.३२ टक्के आहे सँम्पल पर मिलियन ८६८८ आहे अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे कोपरगाव ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही आरोग्य प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेले नियम पाळून, स्वतःची काळजी घेणे आता गरजेचे बनले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page