दिलासा : कोपरगावात सोमवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८. ४८ टक्के
तर कोरोना ग्रस्तांचे प्रमाण केवळ २०. ८९ टक्के
वृत्तवेध ऑनलाईन | 24 Aug 2020, By : RajendraSalkar 15:10
कोपरगाव: सोमवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८. ४८ टक्के तर कोरोना ग्रस्तांचे प्रमाण केवळ २०. ८९ टक्के कोरोना लेले मृत्यू झालेले यांचे प्रमाण केवळ १.८९ टक्के इतकी आहे सोमवारी कोपरगाव येथील कोविड सेंटरमध्ये १७९ रुग्णावर उपचार सुरु आहेत अशी माहिती ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
कोपरगाव कोरोना अपडेट : ३२७८ स्वॅब तपासणी यात ७०३ नगर, रॅपिड टेस्ट, २५७५ निगेटिव्ह तर ६८५ पॉझिटिव्ह, ४६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू, १७९ रुग्णावर उपचार सुरू
सोमवारी (२४) रोजी सकाळी १२३ जणांच्या नमुन्याची रॅपिड अॅण्टिजेन चाचणी केली. यात ४० नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर ८३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ३२ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. सोमवारी दिवसभरात ४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असे डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.
४० पॉझिटिव्ह रुग्णात : गांधीनगर ९, टिळकनगर १०, गुलमोहर कॉलनी १, मुर्शतपुर २, येसगाव १, कोकमठाण ४, धारणगाव ३,पढेगाव २, लक्ष्मीनगर १, बेट १, मोहिनीराज नगर १, श्रद्धा नगरी १, महादेव नगर १, सुदेश टॉकीज जवळ १,निवारा १,शहापूर १, यांचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली.