कोपरगावकरांनो घाबरू नका ; लवकर निदान, लवकर उपचारामुळे कोरोना नियंत्रणात
८० % लोकात कोरोना आढळतच नाही, लॉकडाऊन केल्यास स्फोट होईल
वृत्तवेध ऑनलाईन | 24 Aug 2020, By : RajendraSalkar 17:10
कोपरगाव : गेल्या दोन दिवसापासून येत असलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने घाबरून जाऊ नका, ३१ ऑगस्टपर्यंत पीक पिरियड असल्याने आकडेवारी अशीच असेल अशीच राहील परंतु तपासणीत ८० टक्के लोकांमध्ये कोरोना आढळत नाही. लवकर निदान लवकर उपचार यामुळे कोरोना नियंत्रणात आहे. आजच्या परिस्थितीत घाबरून जर लॉकडाऊन केले. तर मात्र कोरोनाचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. असे मत कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केले.
आजचा काळी जगात फक्त एकच नाव प्रतिध्वनीत होत आहे आणि ते आहे कोरोना व्हायरस. या विषाणूंबद्दल लोकांमध्ये भीतीचे वातावरण असलं तरी घाबरून न जाता त्याचाशी लढा देण्याची गरज आहे. थोडी सावधगिरी बाळगून आपण या समस्येपासून वाचू शकतो. लक्षत ठेवा की या विषाणूंची भीती बाळगण्याऐवजी आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तसेच आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा खबरदारी घेण्यास सांगावे.लवकर निदान लवकर उपचार, ८० % लोकात कोरोना आढळतच नाही. मात्र लॉकडाऊन केल्यास सायलेंट किलर प्रमाणे अनेकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे ही माहिती लोक डॉन मुळे आपल्याकडे पोचू शकत नाही त्यामुळे विचार करण्याचा प्रश्नच येत नाही आज एक जण आढळला तर तातडीने यांच्या संपर्कातील सर्वांची रॅपिड टेस्ट येऊन त्यांच्यावर लगेच उपचार करता येतात त्यामुळे कोरोना नियंत्रणात आहे. डॉ. फुलसौंदर यांनी सांगितले.
डॉ. फुलसौंदर म्हणाले, प्रतिकारक शक्ती कमकुवत असते. म्हणून त्यांना संसर्ग सहजच होतो. कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी वृद्धांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम हे लक्षात ठेवावे की आपले हात वारंवार धुवावे. जेणे करून आपले हात स्वच्छ राहतील आणि संसर्ग आपल्या शरीरात प्रवेश करणार नाही. यासाठी आळस न करता आपण आपल्या मोबाइलमध्ये रिमाइंडर पण लावू शकता.वृद्धांची रोगप्रतिकारक शक्ती खुपच कमकुवत असते. यासाठी आपण आपल्या अन्नाकडे अधिक लक्ष दिले गेले पाहिजे. जेवणात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा, पाणी जास्त प्यावे, हलका व्यायाम करावा. ॐ चा जाप करावा, स्वतःला आरामशीर ठेवावे.
ताजे अन्न खावे. शिळे आणि बाहेरचे अन्न खाऊ नका त्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होते.पूर्ण वेळ घरी राहणे कठीण असते त्या मुळे आपली चिडचिड होऊ शकते. आपणं आपला वेळ आपल्या परिवारातील सदस्यांना देऊन आपला वेळ घालवू शकता. या काळात आपण आपल्या वेळेला परिवारांसोबत घालवू शकता जे करणे आपल्याला शक्य नसते. आपणं आपल्या नातेवाईकांशी पण फोन किंवा व्हिडीओ कॉल करून आपला वेळ घालवू शकतात. अशा सूचना डॉ. फुलसौंदर यांनी यावेळी केल्या.
कोणीही लाॅकडाऊन संबंधी अफवा व नागरिकांमध्ये गैरसमज पसरवू नये.
चौकट
अमोल कोल्हेंनी यात एक भन्नाटआयडियाही सुचवली आहे. “अत्यंत सोपी आणि साधी हात धुण्याची पद्धत आहे. त्यासाठी SUMAN M’ हे नाव लक्षात ठेवा. साबण लावून कमीत कमी २० सेकंद हे चाललं पाहिजे. S – सरळ, U- उलट, M – मूठ, A- अंगठा, N – नखं आणि M म्हणजे मनगट,” असे अमोल कोल्हे म्हणाले.