“एक गाव एक गणपती” बुधवार ची आरती पत्रकारांच्या हस्ते

“एक गाव एक गणपती” बुधवार ची आरती पत्रकारांच्या हस्ते

वृत्तवेध ऑनलाईन | 26 Aug 2020, By : RajendraSalkar 13:10

कोपरगाव : गणेशोत्सवानिमित्त आज बुधवारी (२६ ऑगस्ट) कोपरगाव शहरांमधील मधील शासकीय “एक गाव एक गणपती” सकाळची आरती पत्रकारांच्या हस्ते पार पडली. प्रेस क्लब अध्यक्ष राजेंद्र सालकर पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. अरुण गव्हाणे यांच्या हस्ते संपूर्ण पूजा करण्यात आली.

बुधवारी (२६ऑगस्ट) रोजी सकाळी दहा वाजता विघ्नेश्वर चौक येथील “एक गाव एक गणपती” सकाळची आरती व पूजा करण्यात आली. यावेळी पत्रकार नानासाहेब जवरे, मनोज जोशी, वैभव शिंदे, संजय भवर, अनिल दीक्षित, वीज मंडळाचे अधिकारी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांना आरतीचा मान देण्यात आला.

आजच्या या आरतीला शहरातील नागरिक नगरपालिकेचे अधिकारी महारुद्र गलाट, चंद्रकांत साठे, राजेंद्र गाढे, अभियंता दिगंबर वाघ, अभियंता तुषार नालकर, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब दीक्षित हे देखील उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page