मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन ऑनलाइन साजरा
वृत्तवेध ऑनलाईन | 29 Aug 2020, By : RajendraSalkar 20 :10
कोपरगाव : कोपरगांव तालुका क्रीडा समिति, अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय आणि अहमदनगर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ आयोजित मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून कोपरगांव तालुका क्रीडा संकुलात ऑनलाइन उत्साहाने संपन्न करण्यात आला अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील हे होते.
अशी माहिती सचिव प्राचार्य मकरंद को-हाळकर यांनी दिली आहे .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहमदनगर जिल्हयाचे नुतन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय अॉलिंपिक असो.चे सहसचिव नामदेवराव शिरगांवकर होते. या प्रसंगी मा.शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिलीप घोडके,अरुण चंद्रे अध्यक्ष अ.नगर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ आणि मकरंद को-हाळकर सचिव अ.नगर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आरंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन संजीवनी फाउंडेशनचे सचिव सुमित कोल्हे यांचे हस्ते करण्यात आले. कोपरगांव तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष धनंजय देवकर यांनी सर्वाचे स्वागत केले.क्रीडा संकुलाचे सचिव राजेंद्र पाटणकर यांनी प्रास्ताविक केले.
भारतिय ऑलिंपिक असो.सहसचिव नामदेव शिरगांवकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरिल कोरोना आजारा नंतर क्रीडा क्षेत्रातील चालु घडामोडीची माहीती स्पष्ट करुन सर्व खेळाडुंनी आपली स्वतःची काळजी घ्यावी असे कळकळीचे आवाहन केले.नगर जिल्हातील कोपरगांव चे क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.नुतन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी या प्रसंगी सर्वाना शुभेच्छा देवुन खेळाडू, क्रीडाशिक्षकांनी कोराना काळात आपली शारीरिक क्षमता वाढवुन या संकटाचा एकीने मुकाबला करण्याचे सुचित केले.कोरोनाचे संकट दुर झाल्यावर आपण परत जोमाने सर्व मिळुन जिल्हाचा क्रीडाक्षेत्राचा आलेख परत उंच नेऊ अशी अपेक्षा व्यक्त केली.अ.नगर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघाचे अध्यक्ष अरूण चंद्रे यांनी संकटाचा सामाना खचुन न जाता करावा.असे सांगुन सर्वाना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिलीप घोडके आणि अहमदनगर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघाचे सचिव मकरंद को-हाळकर यांनी खेळाडु, प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले.
या नंतर क्रीडाशिक्षक नितीन निकम यांनी सर्वाना क्रीडा दिनाची शपथ दीली. कोरोना आजारामुळे मुळे दीवंगत झालेले कोपरगांव येथिल नावाजलेले माजी व्हॉलीबॉल पटु हिरामण गंगुले यांना या वेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन क्रीडा समितीचे उपाध्यक्ष शिवप्रसाद घोडके यांनी तर आभार कोपरगांव तालुका क्रीडा समिती चे सचिव निलेश बडजाते मानले.
या कार्यक्रमाला सर्व विद्यालयांतील
क्रीडा शिक्षक , मार्गदर्शक , क्रीडा प्रेमी खेळाडू ऑनलाइन उपस्थित होते.