दिलासादायक कोपरगावात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० .४२ टक्के

दिलासादायक कोपरगावात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० .४२ टक्के

घाबरू नका, अफवांना बळी पडू नका, वृत्तवेध सातत्याने आपल्याला दिलासा देत आहे. आकडेवारी आणि सत्य समोर आहे.

गांधीनगर ,गोरोबा नगर, महादेव नगर या भागात शीघ्रकृती कार्यक्रम (Rapid Action Plan) दोन दिवस : २६७९ घरातील १७०२२ लोकांचा सर्वे करण्यात आला, यात १२६ जणांची चाचणी केली असता १३ जण पॉझिटिव्ह निघाले असून ११३ जण निगेटिव्ह आले आहेत.

वृत्तवेध ऑनलाईन | 30 Aug 2020, By : RajendraSalkar 15:10

कोपरगाव : कोपरगावात रविवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.४२ टक्के हे दिलासादायक आहे. तर कोरोना ग्रस्तांचे प्रमाण केवळ २०.६६ टक्के कोरोनाने मृत्यू झालेले १६ यांचे प्रमाण केवळ १.८९ टक्के इतकी आहे. रविवारी कोपरगाव येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णावर उपचार सुरु आहेत. अशी माहिती ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

कोपरगाव कोरोना अपडेट : आज पर्यंत एकूण बाधित ८४३, आज पर्यंत बरे झालेले रुग्ण ६७८ ,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.४२ %,सद्यस्थितीत ॲक्टिव रुग्णसंख्या १४९ एकूण मृत्यू १६ मृत्यूचे प्रमाण १.८९%

गांधीनगर ,गोरोबा नगर, महादेव नगर या भागात शीघ्रकृती कार्यक्रम (Rapid Action Plan) नियमितपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत भागातील ९५० घरातील ७२६२ लोकांचा सर्वे करण्यात आला यात ४५ जणांची चाचणी केली असता ७ जण पॉझिटिव्ह निघाले असून ३८ जण निगेटिव्ह आले आहेत.

रविवारी सकाळी ७३ जणांच्या नमुन्याची रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी केली. यात १८ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर ५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २५ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. ६३ जणांचे नमुने तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले आहेत.
रविवारी दिवसभरात १८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असे डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.

१८ पॉझिटिव्ह रुग्णात : इंदिरा पथ ५, सुभाष नगर ३, बस स्टँड समोर १, टिळकनगर एक, निवारा एक, नवले वस्ती एक, गांधीनगर एक, पढेगाव एक, टाकळी एक, मुर्शतपुर एक, धारणगाव एक, पांडे गल्ली एक यांचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली.

ठळक बाबी… आतापर्यंत कोपरगाव तालुक्यात ४ हजार ०७९ व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट यात ८४३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तर ३ हजार २३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, आतापर्यंत १६ जणांचे कोरोनाने बळी घेतले.तर ६७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page