अज्ञात कारणावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, दोन अटकेत

अज्ञात कारणावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, दोन अटकेत

वृत्तवेध नेटवर्क । 31Aug 2020
By: Rajendra Salkar

कोपरगाव : अज्ञात कारणावरून
एकाला मारहान केली. यात एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे शुक्रवारी रात्री घडली. यातील दोन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली  आहे.पुंजा भागाजी नरोटे (६०) रा. खंडांगळी तालुका सिन्नर असे मयताचे नाव आहे.

अज्ञात कारणासाठी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दोन जणांनी लाकडी दांडके व लाथ बुक्यांनी मारहाण केल्यामुळे त्यांचा लोणी प्रवरा रुग्णालय येथे ३० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

मयताचा मुलगा सोमनाथ पुंजाजी नरोटे यांनी कोपरगाव ग्रामिण पोलिस स्टेशनला दिलेल्या फियार्दीतवरून पोलिसांनी सांगितले की, २९ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान माझ्या मित्राने फोन करून सांगितले की तुझे वडील कोळपेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोर पडलेल्या अवस्थेत असल्याचे सांगितले मी व माझे आत्या भाऊ त्यांना शोधण्यासाठी गेलो असता तेव्हा ते जखमी अवस्थेत आम्हांला वरील ठिकाणी मिळून आले आम्ही त्यांना पाहिले असता त्यांचा चेहरा व डाव्या बाजूचा डोळा सुजलेला व ओठा जवळ रक्ताचा डाग दिसत होता तेव्हा त्यांना विचार पूस केली असता त्यांनी संगीतले की मला दत्तात्रय किसन कोळपे व श्रावण कोंडाजी हलवर या दोघांनी लाकडी दंडक्याने व लथाबुक्याने मारहाण केली आहे त्यानंतर आम्ही त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले तेथील डॉक्टरांनी त्यांना प्रवरा लोणी येथील रुग्णालयात नेण्यास सांगितले त्यानंतर लोणी येथील रुग्णालयात वडिलांवर औषध उपचार चालू असतांना त्यांचा रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२० रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
वरील दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दत्तात्रय किसन कोळपे वय ४५ व श्रावण कोंडाजी हलवर वय ४४ या दोघांवर भा द वि कलम ३०२/३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आहे यातील दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page