दिलासादायक कोपरगावात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ .६२ टक्के
वृत्तवेध ऑनलाईन | 30 Aug 2020, By : RajendraSalkar 15:10
कोपरगाव : कोपरगावात सोमवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.६२ टक्के हे दिलासादायक आहे. तर कोरोना ग्रस्तांचे प्रमाण केवळ २०.७२ टक्के कोरोनाने मृत्यू झालेले १७ यांचे प्रमाण केवळ १.९८ टक्के इतकी आहे. रविवारी कोपरगाव येथील कोविड सेंटरमध्ये १२३ रुग्णावर उपचार सुरु आहेत. अशी माहिती ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
कोपरगाव कोरोना अपडेट : आज पर्यंत एकूण बाधित ८५५, आज पर्यंत बरे झालेले रुग्ण ७१५ ,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.६२ %,सद्यस्थितीत ॲक्टिव रुग्णसंख्या १२३ एकूण मृत्यू १७ मृत्यूचे प्रमाण १.९८%,
सोमवारी सकाळी २७ जणांच्या नमुन्याची रॅपिड अॅण्टिजेन चाचणी केली. यात ७ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ३५ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. १९ जणांचे नमुने तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले आहेत.
सोमवारी दिवसभरात १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात रॅपिड टेस्ट ७, नगर ३ खासगी २ असे डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.
१२ पॉझिटिव्ह रुग्णात : इंदिरा पथ १, गांधीनगर ३, सुभद्रा नगर ४, गोकुळ नगरी एक ,समतानगर एक, श्रद्धा नगरी एक, अन्नपूर्णा नगर एक यांचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली.
ठळक बाबी… आतापर्यंत कोपरगाव तालुक्यात ४ हजार १२५ व्यक्तींची झाली कोरोना टेस्ट यात ८५५ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तर ३ हजार २७० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, आतापर्यंत १७ जणांचे कोरोनाने बळी घेतले.तर ७१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली.