खिडकीतून हात घालून पर्स पळविली
वृत्तवेध ऑनलाईन | 31 Aug 2020,
By: Rajendra Salkar 15.40
कोपरगाव : घराच्या उघड्या खिडकीतून आंत हात घालून कोणा चोरट्याने सासुबाई ची पर्स घेत पर्ससह पोबारा केल्याची घटना इंदिरा पथ वाणी सोसायटीत घडली. पर्समध्ये रोकडसह दागिने असा सुमारे ३९ हजाराचा मुद्देमाल होता. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Video Player
00:00
00:00
डॉ. अर्चना संदिप मुरुमकर(४८) रा. वृंदावण बंगला, वाणी सोसायटी यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी रात्री ३१ ते सकाळी ६ .३० वाजेच्या दरम्यान घडली. सासूबाईंच्या पर्समध्ये रोख रक्कम ७ प्रो कंपनीचा मोबाईल, ८००० रु , व कानातील सोन्याचे वेल असा ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल होता.
डॉ. अर्चना मुरुमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गु. रजि. नं व कलम : ६२४/२०२० भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.३९१ आर. पी. पुंड हे करीत आहेत.