पत्रकार शाम गवंडी यांना मातृशोक
वृत्तवेध ऑनलाईन | 30 Aug 2020, By : RajendraSalkar 17:10
कोपरगाव : येथील पत्रकार श्याम दादापाटील गवंडी यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई दादापाटील गवंडी यांचे शुक्रवारी (२८ आॅगस्ट) सायंकाळी पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. निधन समयी त्या ५८ वर्षांच्या होत्या.
लक्ष्मीबाई गवंडी या गेल्या काही दिवसापासून आजारी होत्या. बुधवारी (२६ ऑगस्ट) रोजी त्या आपल्या कोपरगाव गजानन नगर येथे रहात्या घरी असताना त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तातडीने उपचारासाठी नगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, कोपरगाव येथे त्यांची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली होती. तसेच नगर येथे ही त्यांची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली होती. नगर येथे दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचारास त्यांच्या प्रकृतीने साथ न दिल्याने शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. यांच्यावर त्याच दिवशी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कोपरगाव अमरधाम येथील स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी गवंडी , वाळुंज,व आढाव कुटुंबिय, त्यांचे नातेवाईक, मित्र वर्ग, पत्रकार आदी उपस्थित होते.त्यांच्या पश्चात मुलगा पत्रकार श्याम गवंडी , तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी रविवारी (६ सप्टेंबर) रोजी होणार असल्याचे गवंडी कुटुंबियांकडून सांगण्यात आले.
कैलास वासी लक्ष्मीबाई दादापाटील गवंडी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून कोपरगाव तालुका प्रेस क्लब अध्यक्ष राजेंद्र सालकर, कोपरगाव तालुका पत्रकार संघ अध्यक्ष अरुण गव्हाणे, पत्रकार सुधाकर मलीक, साहेबराव दवंगे, महेश जोशी, मनोज जोशी, शंकर दुपारगुडे, राहुल देवरे, युसूफ रंगरेज,संजय देशपांडे, वैभव शिंदे, मनिष जाधव, विरेंद्र जोशी, नानासाहेब शेळके, दीपक जाधव, नितीन जाधव, अक्षय खरात,योगेश रुईकर, शैलेश शिंदे, सोमनाथ सोनपसारे, मोबिन खान, हाफिज शेख, रोहीत टेके, अनिल दिक्षित,जाधव, संतोष जाधव भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.