क्रिडा क्षेत्रातील परफार्मन्स अवार्ड”; संजीवनी दूस-या स्थानी – अमित कोल्हे
वैयक्तिक व सांघिक दमदार कामगिरी ७३४ संस्थांना धोबीपछाड, ९७ क्रेडिट पाॅईंटसची कमाई
वृत्तवेध ऑनलाइन। 8 Sep 2020
By: Rajendra Salkar, 17.00
कोपरगांवः आंतर पदविका अभियांत्रिकी विध्यार्थी क्रीडा संघटना (आयईडीएसएसए), महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र शासन पुरस्कृत संघटनेने शैक्षणिक वर्ष १०१९-२० सालात राज्यातील पाॅलीटेक्निक व फार्मसी संस्थांनी क्रीडा क्षेत्रात आघाडी सिद्ध करताना वैयक्तिक व सांघिक स्पर्धेत दमदार कामगिरी करून ७३४ संस्थांना धोबीपछाड देवुन ९७ क्रेडिट पाॅईंटसची कमाई करीत परफार्मन्स अवार्ड”; पटकावून संजीवनी केबीपी पाॅलीटेक्निक दूस-या स्थानी आल्याची माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की आयईडीएसएसए या संघटनेचे अध्यक्ष आणि गव्हर्णमेंट पाॅलीटेक्निक, पुणेचे प्राचार्य डाॅ. व्ही. एस. बांदल व संघटनेचे सचिव प्रा. एस.एस. हरीप यांनी अधिकृत पत्रकाद्वारे हा पुरस्कार जाहिर केला आहे. आयईडीएसएसए ही संघटना अभियांत्रिकी, फार्मसी व इतर तांत्रिक पदविका शिक्षण देणाऱ्या महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमधिल प्रतिवर्षी विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन करते व आणि क्रिडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या संस्थाना पुरस्कार देते.
महाराष्ट्रात ३७८ पाॅलीटेक्निकस् व ३५६ डी. फार्मसी अशा एकुण ७३४ संस्था आहेत. या सर्व संस्थांसाठी आयडीएसएसए ही संस्था विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन करते. संजीवनी पाॅलीटेक्निकने शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये विभागीय पातळीवर वैयक्तिक खेळात मुलांनी ६ खेळात प्रथम विजेते पद तर ३ खेळात द्वितिय क्रमांक मिळविला. सांघिक खेळात २५ खेळांमध्ये प्रथम तर ३ खेळात द्वितिय क्रमांक मिळविला. विभागीय पातळीवरच मुलींनी वैयक्तिक खेळात ६ क्रिडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला तर २ खेळांमध्ये द्वितिय क्रमांक मिळविला. सांघिक खेळात १० खेळांमध्ये मुलींनी प्रथम क्रमांक मिळविला तर ६ खेळात द्वितिय क्रमांक मिळविला. राज्यस्तरीय स्पर्धेत वैयक्तिक खेळात ५ खेळात मुलांनी तर ३ खेळात मुलींनी बाजी मारून राज्यात अव्वल असल्याचे सिध्द केले. तर ५ सांघिक खेळात मुलींना राज्यात द्वितिय स्थान पटकाविले. याच बरोबर १५ वेगवेगळ्या क्रिडा स्पर्धा घेण्यासाठी संजीवनीने यजमान पद भूषविले तर ८ क्रिडा प्रकारांसाठी मुख्यालयाची भुमिका सांभाळली. संजीवनी पाॅलीटेक्निकला असे ९७ क्रेडिट पाॅईंटस् मिळाले आणि राज्यात क्रिडा क्षेत्रात दुसऱ्या स्थानावर असल्याचे सिध्द केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष व माजी शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितिन कोल्हे व अमित कोल्हे यांनी संपुर्ण राज्यात संजीवनीच्या या उपलब्धी बध्दल प्राचार्य ए. आर. मिरीकर, फिजिकल डायरेक्टर प्रा. बी. एन. शिंदे व ज्या महिला व पुरूष शिक्षकांनी वेगवेगळ्या टीम्सला पुढे नेले या सर्वांचेे अभिनंदन केले.