आमदार आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याने धनगरवाडी फाटा ते रक्टे वस्ती रस्ता प्रगतीपथावर– अनिल रक्टे
वृत्तवेध ऑनलाईन। 9 Sep 2020
By : Rajendra salkar, 12.00
कोपरगाव : विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील धनगरवाडी फाटा ते रक्टे वस्ती या रस्त्याच्या रखडलेल्या कामाला आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून चालना मिळाली असून या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हा रस्ता नागरिकांसाठी खुला होणार असल्याचे धनगरवाडीचे उपसरपंच अनिल रक्टे यांनी दिली आहे.
धनगरवाडी येथील रेल्वेच्या बोगद्यामुळे धनगरवाडी फाटा ते रक्टे वस्ती या रस्त्याचे काम रखडलेले होते. त्यामुळे या रस्त्याने नियमितपणे ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत होता. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी धनगरवाडीच्या नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री सडक योजनेचे अभियंता अमित चोळके यांच्या समवेत बैठक घेवून योग्य तोडगा काढून या रस्त्याचे काम मार्गी लावण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली होती. मुख्यमंत्री सडक योजनेचे अहमदनगरचे कार्यकारी अभियंता सानप, नासिकचे अधीक्षक अभियंता चंद्रकांत वाघ यांचेशी आमदार आशुतोष काळे यांनी संपर्क करून या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे यासाठी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यातून धनगरवाडी फाटा ते रक्टे वस्ती या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम लवकरात पूर्ण होणार असल्यामुळे धनगरवाडीच्या नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून धनगरवाडी ग्रामस्थांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.