शहराला दोन दिवसआड पाणी द्या,व औषध फवारणी करा – बळीराजा पार्टी

शहराला दोन दिवसआड पाणी द्या,व औषध फवारणी करा – बळीराजा पार्टी

वृत्तवेध ऑनलाइन ।10.Sep 2020
By: Rajendra Salkar, 13.35

कोपरगाव : पावसाळा आहे शहराला दोन दिवसात पाणी द्या व साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी तातडीने औषध फवारणी करा अशी मागणी बळीराजा पार्टीच्या वतीने नगरपालिकेकडे करण्यात आली असून तातडीने कारवाई न झाल्यास पालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा बळीराजा पार्टीच्या वतीने पालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.

पावसाळा असुनही शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे घराघरात पाणी साठवणूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे यामुळे साथीचे रोग होण्याची शक्यता वाढली आहे एक तर आधीच कोरोनाचे संकट असून त्यात साथीचे संकट उभे ठाकल्यास मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकते. पावसाला आपण रोखू शकत नाही परंतु पाणीपुरवठा दोन दिवसाआड केल्यास पाणी साठवणूक करण्याची गरज राहणार नाही त्यामुळे आपोआपच डासांची उत्पत्ती थांबून साथीच्या रोगांना आळा बसेल !

शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने रस्त्यावरील खड्डे आज ठिकठिकाणी पाणी साचले आहे त्यामुळे साथीचा रोगाचा प्रादुर्भाव होण्यास वेळ लागणार नाही परिणामतः साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे तरी कृपया सदर प्रकारात जातीने तातडीने लक्ष घालून शहराचा पाणी पुरवठा दोन दिवसआड करावा तसेच शहरात जंतुनाशक औषध फवारणी करावी अशी मागणी नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे बळीराजा पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे यावर तातडीने कारवाई न झाल्यास पालिकेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा बळीराजा पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.

सदर निवेदन गुरुवारी (१० सप्टेंबर) रोजी सकाळी बळीराजा पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना त्यांच्या दालनात जाऊन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष अमोल आचारी, उपाध्यक्ष किरण महाजन सचिव अनिल गाडेकर, अखिलेश देशमुख, तसेच बापुराव चव्हाण, सोपान महाजन हे उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page