संजीवनी फार्मसीच्या आठ विध्यार्थ्यांची ऑनलाईन मुलाखतीत सायटेक मध्ये निवड – अमित कोल्हे

संजीवनी फार्मसीच्या आठ विध्यार्थ्यांची ऑनलाईन मुलाखतीत
सायटेक मध्ये निवड – अमित कोल्हे

 

सायटेक मध्ये निवड झालेले विद्यार्थी

वृत्तवेध ऑनलाइन ।10 Sep2020
By: Rajendra Salkar, 12.30

कोपरगांव: संजीवनी फार्मसी महाविद्यालया अंतर्गत बी. फार्मसीच्या सहा व एम. फार्मसीच्या दोन विद्यार्थ्यांची सिन्नर येथिल सायटेक स्पेशालिटीज प्रा. लिमिटेड या औषध निर्माण कंपनीने कोविड १९ च्या काळात ऑनलाईन मुलाखती घेवुन नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या मात्र अशाही परीस्थितीमध्ये संजीवनी ग्रुप ऑफ इन्सिट्यूट्स अंतर्गत असलेल्या फार्मसी, एम.बी.ए., इंजिनिअरींग, पाॅलीटेक्निक या संस्थांमधिल विद्यार्थांना उद्योग जगताकडून मागणी होत आहे, ही संजीवनीची उपलब्धी असल्याची माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की संजीवनी फार्मसी महाविद्यालयाचा नावलौकिक हा एक दर्जेदार संस्था म्हणुन आहे. या संस्थेतील अनेक माजी विध्यार्थी अनेक मोठमोठ्याा कंपन्यांमध्ये कार्यरत असुन अनेक ठिकाणी येथिल माजी विध्यार्थी संशोधनामध्ये आघाडीवर आहे. या सर्व बाबींची दखल घेत अनेकदा अनेक कंपन्या संजीवनी फार्मसी महाविद्यालयाकडे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची मागणी करीत असतात. अलिकडेच सायटेक स्पेशालिटीज प्रा. लिमिटेड या औषध निर्माण कंपनीने संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाकडे विद्यार्थ्यांची मागणी केली. संस्थेने होकार देताच कंपनीने ऑनलाईन पध्दतीने मुलाखती घेतल्या व एकुण आठ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना नोकरीत रूजु होण्याच्या आर्डर्स दिल्या. यात एम. फार्मसीच्या निलेश लहानु गावडे व रूपेश रावसाहेब तगड यांचा समावेश आहे तर बी. फार्मसीच्या स्वाती मिनानाथ कुळधर, तृप्ती भिमराज काकडे, शुभम किसनलाल फुलमाळी, पुष्पांजली नवनाथ बनकर, पराग धनराज पवार व गणेश सोमनाथ बनकर यांचा समावेश आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष  नितीनराव कोल्हे, अमित कोल्हे यांनी सर्व विध्यार्थी व त्यांचे पालक, प्राचार्य डाॅ. किशोर साळुंखे आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. अजिंक्य कुऱ्हे यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page