निधी आणण्यात आमदाराची भूमिका महत्वाची असते – विरेन बोरावके

निधी आणण्यात आमदाराची भूमिका महत्वाची असते – विरेन बोरावके

वृत्तवेध ऑनलाइन ।10Sep2020
By: Rajendra Salkar, 11.00

कोपरगाव : मतदार संघाच्या विकासकामांसाठी निधी आणण्यात आमदारांची भूमिका अत्यंत महत्वाची असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मिळत असतो. मात्र ज्यांना याची माहितीच नाही अशा अज्ञानी व्यक्तींनी यावर बोलू नये असा टोला राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके यांनी विवेक कोल्हे यांचे नाव न घेता लगावला आहे.

कोपरगाव नगरपरिषदेला १४ व्या वित्त आयोगाचा निधी हा आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यामुळेच मिळाला असून त्यांचे बोलणे हास्यास्पद असून वक्तव्य अज्ञानी पणाचे असल्याची टीकाही प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आली आहे.

कोरोनामुळे कोपरगाव शहरासाठी निधीसाठी अडचणी येवू नये यासाठी एक महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पडून होता. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार भेटून आ. काळे यांच्या प्रयत्नातून ६ कोटी निधी आला आहे. यापूर्वी जिल्हा नियोजनमधून देखील विविध विकासकामांसाठी २ कोटी रुपये व कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत २ कोटी रुपये निधी आणला आहे. तुमच्या नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांसाठी देखील आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे निधी मिळाला आहे. माहिती घेवून व खातरजमा करूनच वक्तव्य करावे असे ही पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page