कार्यकर्तृत्वाचा ठसा ; उत्कृष्ट आसवनी व्यवस्थापक “जयंतराव भिडे”

कार्यकर्तृत्वाचा ठसा ;
उत्कृष्ट आसवनी व्यवस्थापक “जयंतराव भिडे”

Impression of activism;

वृत्तवेध ऑनलाईन।Fri18Sep2020
By: Rajendra Salkar, 16.00

जयंत भिडे मितभाषी धार्मिक प्रवृत्तीचे होते व अत्यंत सचोटीने व व मेहनतीने काम करत अत्यंत विश्वासू नम्र सेवक म्हणून राहिले भिडे यांची सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची कार्यपद्धती होती कै. माजी खासदार शंकराव काळे यांचे ते विश्वासू अधिकारी होते. आसवनी व कंट्री लिकर इंडस्ट्रीत जुने ज्येष्ठ जाणकार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. राज्य शासनाच्या विविध पॉलिसी ठरविण्यामध्ये त्यांचा सल्ला घेतला जात असे, त्यामुळे अनेक कमिट्यांवर ते सल्लागारही होते. त्यांना दहा वर्षापूर्वी उत्कृष्ट आसवनी व्यवस्थापक म्हणून गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. जयंतराव भिडे यांच्या अचानक जाण्याने आसवनी व कंट्री लिकर इंडस्ट्रीचे विशेषतः कर्मवीर शंकरराव काळे कारखाना आसवानी विभागाचे
मोठे नुकसान झाले आहे. गुजरात विशेषतः कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे आसवनी विभागाचे सरव्यवस्थापक म्हणून त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा अमिट असा ठसा आहे.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे आसवनी विभागाचे सरव्यवस्थापक जयंतराव अनंतराव भिडे (७९) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. त्यांचे मागे पत्नी सविताताई, मुलगी माधवी मुंबई व पल्लवी पुणे जावई वैभव जोगळेकर, सचिन जोशी नातवंडे आदित्य मानसी व सुमेध असा परिवार आहे. कै. जयंतराव भिडे यांनी कृष्णा सहकारी साखर कारखाना तसेच गुजरात राज्यात व कोळपेवाडी येथे आसवनी विभागात सरव्यवस्थापक म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे काम केले होते १९७४ साली २०१९ कोळपेवाडी आसवनी विभागात रुजू झाले होते. जुलै २०१९ मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. डिस्टिलरी चे स्थापनेपासून त्यांनी अत्यंत सचोटीने व व मेहनतीने काम करत कारखाना व्यवस्थापनाशी प्रामाणिक राहिले.

जयंतराव भिडे यांचे वडील अनंतराव सदाशिव भिडे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची समवेत काम केले होते. अशा संस्कारात वाढलेल्या भिडे विश्वासू नम्र सेवक या
त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे घेऊन जाणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Leave a Reply

You cannot copy content of this page