टाकळीच्या दगडी साठा बंधारा फुटला, आमदार काळेंनी केली पाहणी

टाकळीच्या दगडी साठा बंधारा फुटला, आमदार काळेंनी केली पाहणी

The dam burst

वृत्तवेध ऑनलाईन।Fri18Sep2020
By: Rajendra Salkar, 17.30

कोपरगाव : तालुक्यातील गुरूवारी
रात्रीच्या सुमारास टाकळी येथील दगडी साठा बंधारा फुटल्यामुळे बंधाऱ्यालगत असलेल्या शेतात पाणी शिरून या पिकांचे नुकसान झाले आहे. याची पाहणी आमदार आशुतोष काळे यांनी कळविले असून कृषी अधिकारी अशोक आढाव यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सोयाबीन, मका, बाजरी, ऊस यासह इतर पिके उद्धवस्त झाली आहे. अनेक कांदा चाळीतदेखील पाणी शिरल्यामुळे शेकडो टन कांदा भिजून खराब झाला आहे. या बंधारा फुटीचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत .

जून महिन्यापासून पाऊस पडत आहे. कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे शेतातील पिके पिवळी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे. . बंधाऱ्याचे लोखंडी गेट उघडले गेले नाही. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. भविष्यात या बंधाऱ्यात पाणी साठले जावे यासाठी या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करा अशा सूचना आशुतोष काळे यांनी केल्या आहेत.

यावेळी सभापती सौ. पौर्णिमा जगधने, विठ्ठलराव आसने, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, उपअभियंता उत्तम पवार, व शेतकरी हजर होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page