जलजीवन मिशन लोकवर्गणीची रद्दसाठी अजित पवारांना साकडे

जलजीवन मिशन लोकवर्गणीची रद्दसाठी अजित पवारांना साकडे

Aquatic Mission

वृत्तवेध ऑनलाईन।Fri18Sep2020
By: Rajendra Salkar, 15.40

कोपरगाव: राज्यात राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनांसाठी ग्रामपंचायतीने दहा टक्के निधी लोकवर्गणीतून जमा करण्याची अट रद्द करावी यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना आमदार आशुतोष काळे यांनी साकडे घातले.

शासनाच्या जलजीवन मिशन योजनेच्या लाभार्थ्यांना त्या गावातील ८० % कुटुंबाकडून या योजनेच्या एकूण पायाभूत सुविधा खर्चातील एकूण भागभांडवलापैकी १० टक्के लोकवर्गणी गोळा होणे आवश्यक आहे. मात्र ग्रामपंचायतीकडून लोकवर्गणी गोळा होणे शक्य नसल्याने याबाबत नामदार अजित पवार यांची भेट घेऊन आमदाराशी दुष्काळ यांनी त्यांना दहा टक्के लोकवर्गणीची अट रद्द करण्याची मागणी केली . २००९ ते २०१४ मध्ये आघाडीचे सरकार काळात तत्कालीन आमदार अशोक काळे यांनी लोकवर्गणीची अट शिथिल करण्याची मागणी केली होती तेव्हा पण ती अट रद्द केली होती अशी आठवण अजित पवार यांना आशुतोष काळे यांनी करून दिली. व जल जीवन मिशन योजनेसाठी लोकवर्गणीची अट रद्द करावी अशी मागणी आशुतोष काळे यांनी केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page