नागरी पतसंस्था प्रश्नाबाबत,दोन्ही पाटील मंत्र्यांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत- काका कोयटे

नागरी पतसंस्था प्रश्नाबाबत,दोन्ही पाटील मंत्र्यांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत- काका कोयटे

मरासपफेच्या पाठपुराव्याला आलेले यश

वृत्तवेध ऑनलाईन।Sun20Sep2020
By: Rajendra Salkar, 12.30

कोपरगाव : राज्यातील नागरी पतसंस्थांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन पाठपुरावा करत आहे. प्रभारी सहकार मंत्री जयंत पाटील यांचे अध्यक्षतेखाली २८ ऑगस्ट रोजी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीचे अनुषंगाने काही विषयांचे आदेश ना. जयंत पाटील व ना. बाळासाहेब पाटील या या दोन्ही सहकार मंत्र्यांनी काढले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत आहे. हे कक्राश्रज्य पतसंस्था फेडरेशनच्या पाठपुराव्याला आलेले यश असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली. एकाच बैठकीत सहकारी पतसंस्थांचे बरेच प्रश्न मार्गी लागण्याची हि पहिलीच वेळ असल्याचे ते म्हणाले.

एकाच बैठकीत एवढे चांगले निर्णय घेतल्यामुळे अर्थमंत्री जयंत पाटील व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सांगलीचे माजी महापौर व प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.

हे आहेत निर्णय

पतसंस्थांच्या थकबाकी वसुलीसाठी कायदा कलम १०१ चे दाखले ऑनलाइन ६० दिवसात मिळणे, ‘अपसेट प्राईस’ दोन महिन्यात न मिळाल्यास ऋणको संस्थेने दाखल केलेली अपसेट प्राईस मान्य, धनको संस्थेचे व ऋणको संस्थेचे एकमत न झाल्यास ऋणकोस ती मालमत्ता विकण्यासाठी ३० दिवसांची मुदत देऊन त्यानंतर धनको संस्थेस हि मालमत्ता विकण्यास परवानगी, राज्य फेडरेशनच्या वतीने कर्जदारांची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘क्रास प्रणाली’ सक्तीची करणे, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या ठेवी प्राधान्याने परत द्याव्यात, कोरोनाचे पार्श्वभूमीवर पतसंस्थांना थकीत कर्ज ‘एन.पी.ए.’ मुदत १५ महिने, ‘अ’ वर्गासाठी ६५ व ‘ब’ वर्गासाठी ५० गुण गृहीत धरावेत, पतसंस्थांना शासकीय कर्जरोख्या मध्ये गुंतवणूक करण्याबाबत परवानगी, तसेच SLR ची गुंतवणूक १०% पर्यंत करणे, ‘ऑनलाइन पोर्टल’ तयार करणे, अपसेट प्राईस ६ महिन्या ऐवजी एक वर्ष पर्यंत वैध ठेवणे, राज्य फेडरेशनच्या शिर्डी येथील प्रशिक्षण केंद्रास मान्यता देणे, तसेच राज्य फेडरेशनच्या अस्थापनेवर कलम १०१ चे वसुली दाखलेसाठी परसेवेवरील अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अहमदनगर जिल्ह्या स्थैर्य निधीचे धर्तीवर राज्य पातळीवर स्थैर्य निधी संघ स्थापन करणे, या निर्णयांबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष वसंतराव शिंदे, महासचिव शांतीलाल सिंगी, कार्याध्यक्ष राजुदास जाधव, खजिनदार दादाराव तुपकर, उपंकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, संचालक सर्जेराव शिंदे, स्थैर्य निधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, नाशिक विभागीय फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, तसेच महिला सबलीकरण समितीच्या अध्यक्षा सौ.अंजली पाटील व शिवकृपा पतसंस्थेचे संस्थापक चंद्रकांत वंजारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

वरील सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबतचे परिपत्रक सहकार आयुक्त कार्यालयाने तातडीने काढावे अशी विनंती सहकार आयुक्त अनिल कवडे व अप्पर निबंधक पी. एल. खंडांगळे, उपनिबंधक राम कुलकर्णी यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या सर व्यवस्थापिका सौ. सुरेखा लवांडे यांनी केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page