गुरव समाज बांधव विविध मागण्यांसाठी पाठविणार ; थेट मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे यांची माहिती
१ ते ८ ऑक्टोबर आठ दिवस पाठविणार घराघरातून पत्र
वृत्तवेध ऑनलाईन।Sun20Sep2020
By: Rajendra Salkar, 12.30
कोपरगाव : कोरोना पार्श्वभूमीवर मंदीरे बंद करण्यात आली असून मंदिर पुजारी गुरव यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तेंव्हा मंदिरे खुली करण्याबरोबरच गुरव समाज बांधव आपल्या विविध मागण्यांकडे मा.मुख्यमंत्री व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील घराघरातून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहणार असल्याची माहिती अखिल गुरव समाज संघटना, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी(१९ सप्टेंबर) रोजी ऑनलाइन गुरव समाज पदाधिकारी समन्वय समितीची बैठक पार पडली. यावेळी झालेल्या चर्चेत समन्वय समिती सदस्यांनी आपआपली मते मांडली. करोना सदृष्य परिस्थिती व संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली.
यावेळी १ ऑक्टोबर २०२० या दिवशी एकाच वेळेस संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत गुरव समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. तसेच गुरुवारी १ ऑक्टोबर पासून ते गुरुवारी ८ ऑक्टोबर पर्यंत या आठवडा काळात महाराष्ट्रातील सर्व गुरवसमाज बांधव, भगिनींनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय मा.उद्धव ठाकरे यांना आपल्या मागण्यांचे पत्र पाठवायचे आहे. हे दोन निर्णय घेण्यात आले. करोना काळात आपले मोठे आंदोलन होऊ शकत नाही, म्हणून मा.मुख्यमंत्री व सरकारचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधण्यासाठी सर्वांनी १) करोना संकट काळात राज्यातील बहुतांश मंदिरे बंद आहेत,गुरव पुजाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे,आशा परिस्थितीत शासनाने राज्यातील गुरव समाजाला आर्थिक सहकार्य करावे.२) इनाम वर्ग ३ जमिनींवर पिक कर्ज उपलब्ध करून घ्यावे.३) इनाम वर्ग ३ च्या जमिनी खालसा करून,तसेच बेकायदेशीर हस्तांतरण व कुळ काढून त्या जमिनी मूळ सनद धारकास देण्यात याव्यात.
४) आमचा परंपरागत पूजा अर्चेचा व उत्पन्नाचा हक्क कायम करणे.५) सर्व देवस्थान ट्रस्ट मध्ये गुरव पुजाऱ्याला ५०% प्रतिनिधित्व देणे. ६) गुरव समाजातील युवक व महिलांना उद्योग व्यावसाय उभारणीसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे. ७) प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी गुरव समाजातील मुले व मुलींना वसतिगृहासाठी जागा व निधी उपलब्ध करून घ्यावा.८) अतिवृष्टी मूळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी. ९)दिवसेंदिवस गुरव समाजावर अन्याय अत्याचार वाढत चालले असून,त्यामुळे समाजाच्या संरक्षणासाठी ॲट्रॉसिटी सारखा कडक कायदा लागू करावा.१०) ६० वर्ष वयोगटावरील पुजाऱ्यांना निर्वाह भत्ता मिळावा. ११) बेलफुल वाटणारे व वाद्यकाम करणाऱ्या व कलावंत गुरवांना आर्थिक मदत मिळावी. या मागण्यांचे पत्र पाठवावीत.असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सदर पत्राचा नमुना व मुद्दे समितीकडून देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे
शनिवारी (१९ सप्टेंबर) रोजी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुधाकर खराटे, मानद अध्यक्ष वसंत बंदावणे(सर), श्रीमंत सोनाळे,शिवाजी साखरे,विजय तपाडकर, कार्यकारी अध्यक्ष नवल शेवाळे, संतोष वाघमारे, रंगनाथ गुरव, प्रदेश कार्याध्यक्ष दिलीप पुसदकर,अध्यक्ष गुरव चेंबर्स ऑफ कॉमर्स अनिल पुजारी, मुख्य सरचिटणीस विलास पाटील,सुभाष (अण्णा) शिंदे, प्रदेश महिला अध्यक्ष सुरेखा तोरडमल, अध्यक्ष देवस्थान समिती धनंजय दरे, प्रदेश युवा अध्यक्ष महेश शिर्के, महिला मानद अध्यक्ष संगीता गुरव, मुख्य सरचिटणीस डॉ.मनीषा गुरव,मनिषा पांडे, वधू-वर समिती प्रमुख भाग्यश्री भालेराव, प्रशांत गुरव (अक्कलकोट),महेश गुरव,(कणकवली) एन.टी. गुरव,(नंदुरबार), सचिन धारूरकर, (उस्मानाबाद), यांनी चर्चेत भाग घेतला.