गोदावरी नदीत अडीच हजार क्युसेस चे विसर्ग सुरू

गोदावरी नदीत अडीच हजार क्युसेस चे विसर्ग सुरू

कोपरगावला ३५ मिलीमीटर (१ इंच १० मिलिमीटर) पावसाची नोंद

शहरातील मुख्य रस्त्यावर आंबेडकर पुतळ्या नजीकच्या मैदानावर तुंबलेले पाणी (छाया विजय वाजे कोपरगाव)

वृत्तवेध ऑनलाईन।Sat19Sep2020

By: Rajendra Salkar, 19.30

कोपरगाव : शनिवारी शहर व तालुक्याच्या परिसरात एक ते सव्वा तास मुसळधार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे. गोदावरी डावा तट कालवा कार्यालयात ३५ मिलिमीटर पाऊस( एक इंच दहा मिलिमीटर )पडल्याची नोंद झाली आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील दारणा, मुकणे, गंगापूर, कडवा, कश्यपी, गौतमी, वालदेवी, वाकी, भाम  ही धरणे  जवळपास शंभर टक्के  भरली आहेत आळंदी धरण ९० टक्के भरले  आहे. नाशिक घोटी, इगतपुरी, नांदूर मध्यमेश्वर परिसरातही  पाऊस चांगल्या प्रमाणात होत असल्याने गोदावरी नदीला २४२१   क्यूसेक्स पाणी दारणा, गंगापूर धरणातून नांदूर मधमेश्वर  बंधाऱ्यातून सोडण्यात आले आहे .

कोपरगाव येथे ३५ मिलीमीटर म्हणजे एक इंच १० मिली मीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. ऊस फळबागांना पाऊस चांगला आहे मात्र सोयाबीन व इतर पिकांना याचा काही प्रमाणात फटका बसणार आहे. डावा उजवा व जलद कालवा बंद आहे अशी माहिती पाटबंधारे खात्याने दिली आहे. 
          पडलेल्या पावसाने शहरातील रस्ते गटारी घरे स्वच्छ धुऊन गेले असून ठिकाणी प्रभागात पाणी साठले आहे त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर काही ठिकाणी कचरा  सडल्याने तेथे दुर्गंधी पसरली असून नगरपालिकेने याची गांभीर्याने दखल घेऊन तो तातडीने हलविण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

चौकट

गोदावरी डाव्या तट कालव्याचे कार्यालय येथे आहे. येथील दूरध्वनी गेल्या दोन महिन्यांपासून बिल न भरल्याने बंद आहे त्यामुळे पावसाची आकडेवारी व इतर बाबींसाठी शेतकऱ्यांना संपर्क होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page