भाजपाचे अनुसूचित जाति मोर्चा जिल्हाध्यक्षपदी विनोद राक्षे
वृत्तवेध ऑनलाइन। Thu 29Sep2020
By: Rajendara Salkar, 19.00
कोपरगाव : भाजपची जिल्हा कार्यकारिणी अखेर मंगळवारी (२९) रोजी जाहीर झाली. इच्छुकांची संख्या वाढल्याने व कोरोनामुळे तब्बल सहा महिन्यांनी या कार्यकारिणीला अंतिम स्वरूप आले.
उत्तर नगर जिल्हात भाजपाची जम्बो कार्यकारणी जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर यांनी जाहीर केली या कार्यकारणी मध्ये (१०)उपाध्यक्ष (१) संघटन सरचिटणीस (२) सरचिटणीस (१) कोषाध्यक्ष (८)सचिव तसेच महिला मोर्चाच्या अध्यक्षा, युवा मोर्चा अध्यक्ष, अनुसूचित जाति मोर्चा अध्यक्ष, आदिवासी मोर्चा अध्यक्ष, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष, किसान मोर्चा अध्यक्ष व इतर मागासवर्गीय मोर्चा अध्यक्ष तसेच प्रसिद्धीप्रमुख कामगार आघाडी, उत्तर भारतीय आघाडी, उद्योग आघाडी व्यापार आघाडी, भटकेविमुक्त आघाडी, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल, दिव्यांग सेल, सहकार सेल, वैद्यकीय सेल, कायदा सेल, सांस्कृतिक सेल, शिक्षण मच्छिमार सेल, सोशल मीडिया सेल, माजी सैनिक सेल, दक्षिण भारतीय सेल, आध्यात्मिक समन्वय आघाडी व ट्रान्सपोर्ट सेल आदीं विभागनिहाय निवड जाहीर करण्यात आली आहे
तर नविन श्रीरामपूर संगमनेर, राहाता, कोपरगाव पदाधिकारी ची तालुका अध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदाच्या निवडी नव्याने जाहीर केल्या आहेत, त्याच प्रमाणे कायम निमंत्रीत सदस्य म्हणून श्याम जाजू मा. मंत्री मधुकर पिचंड, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे,माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के ,माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे, एडवोकेट रवी काका बोरावके, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे ,माजी आमदार वैभव पिचड, सिताराम गायकर ,हेरंब वासुदेव औटी, उदयसिंग चडेल,विठ्ठलराव लंघे,राजेश चौधरी,ममता भाभी पिपाडा यांची वर्णी लागली आहे तर कार्यकारणी सदस्य अकोले,संगमनेर,राहता कोपरगाव, श्रीरामपूर,नेवासा येथील कार्यकर्त्याची या कार्यकारिणीमध्ये त्यांना संधी देण्यात आली असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी माहिती दिली
राजेंद्र गोंदकर यांनी जाहीर केलेली नूतन जिल्हा कार्यकारिणी कोपरगावचे शहराध्यक्ष दत्ता काले, – अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विनोद मच्छिंद्र राक्षे (कोपरगाव), जिल्हा उपाध्यक्ष – शरद रावसाहेब थोरात (कोपरगाव), जिल्हा सचिव – किरणताई महावीर दगडे (कोपरगाव), नरेंद्र जगन्नाथ डंबीर (कोपरगाव), कैलास वसंतराव खैरे (कोपरगाव), कामगार आघाडी जिल्हा संयोजक सतीश पन्नालाल चव्हाण
(कोपरगाव) यांचा समावेश आहे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा साई संस्थानचे विश्वस्त संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे, भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे, औद्योगिक वसाहत अध्यक्ष चेअरमन विवेक कोल्हे अमृत संजीवनी चेअरमन पराग संधान, अॅड. रवींद्र बोरावके, गटनेते रवींद्र पाठक, जिल्हा उपाध्यक्ष शरद नाना थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, सर्व नगरसेवक, पदाधिकारी, यांनी त्यांचे अभिनंदन केले.