चांदेकसारे ग्रामपंचायतीकडून सहा अंगणवाड्यांना किचन सेट
वृत्तवेध ऑनलाइन। Wes 30Sep2020
By: Rajendara Salkar, 14:00
कोपरगाव : ग्रामपंचायत चांदेकसारेच्या वतीने गावातील सहा अंगणवाडी केंद्रासाठी एक लाख रुपये खर्च करून कढाई,पातेले,स्टिल मांडणी, कुकर, गॅस शेगडी, पाण्याचे जग, झाकणी, पळे,उचटणी,सांडसी अदि असा किचन सेट देण्यात आला तर चार झेडपी शाळेत ४० इंची एलईडी टीव्ही देण्यात आले.एका टीव्हीला निधी कमी पडत असल्यामुळे माजी सरपंच केशवराव होन यांनी तो उपलब्ध करून दिला.
चांदेकसारेचे माजी सरपंच व साई आधार प्रतिष्ठानचे मार्गदर्शक केशवराव होन म्हणाले, आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असतात. शैक्षणिक ज्ञानाबरोबर व्यावाहारिक ज्ञान देवुन शिक्षक त्यांना घडवितात तर शिशु वयात अंगणवाडी सेविका व मदतनीस विद्यार्थ्यांच्या आहाराची व आरोग्याची काळजी घेतात. हे दोन्हीही घटक गावांसाठी महत्त्वाचे असतात गावच्या विकासात अंगणवाडी सेविका व प्राथमिक शिक्षकांचा हातभार महत्त्वाचाच आहे असे ते म्हणाले,
यावेळी सरपंच पुनम खरात, उपसरपंच विजय होन, ॲड ज्ञानेश्वर होन, आनंदराव होन, राहुल होन, अर्जुन होन, दिलिप होन, डॉ सुनील होन, मनिषा माळी, मुख्याध्यापक श्री पोटे, सिताराम गुरसळ, मलु होन, ग्राम विकास अधिकारी प्रल्हाद सुकेकर,वाल्मिक खंडीझोड अदी उपस्थित होते.
प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद सुकेकर यांनी केले.
वाल्मिक खंडीझोड यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीने दिलेल्या साहित्याचा वापर करून विद्यार्थी घडविण्यासाठी कटिबद्ध राहु असे आश्वासन दिले. चांगले काम करा गावच्या विकासात भर घाला म्हणत आभार उपसरपंच विजय होन यांनी मानले.