माजी नगरसेवक दत्ता काले यांची कोपरगाव भाजपा शहराध्यक्षपदी नियुक्ती
वृत्तवेध ऑनलाइन। Thu 29Sep20
By: Rajendara Salkar, 17.30
कोपरगाव : माजी नगरसेवक तथा तुळजाभवानी तरुण मंडळाचे संस्थापक दत्ता काले यांची कोपरगाव भाजपा शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भारतीय जनता पार्टी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर यांनी दत्ता काले यानां नियुक्ती पत्र दिले. शहरातील कार्यकर्त्यांचे संघटन वाढीसाठी शहराध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे असे जिल्हाध्यक्ष गोंदकर यांनी सांगितले .
आगामी निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने आता नव्या शहराध्यक्षांची नेमणूक तातडीने केली जावी, अशी भाजपातील अनेकांची मागणी होती . विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा निसटता पराभव झाल्यानंतर पालिका निवडणुकांपूर्वी शहराध्यक्ष बदलण्याच्या मागणीने जोर धरला होता. भाजपाच्या पक्ष नेतृत्वाने त्याचे संकेत दिले होते. पक्षाच्या स्थापनेपासून सातत्याने काम करणाऱ्या संघटनेतील एखाद्या जुन्या-जाणत्या कार्यकर्त्याला संधी मिळेल, अशी शक्यता होती. त्यादृष्टीने, पक्षानेच शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. शहरातील इतर सर्वच पक्षांच्या अध्यक्षपदी नव्या चेहऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने भाजपमध्ये खांदेपालट होईल, अशी अटकळ बांधण्यात येत होती. अखेरच्या टप्प्यात मा.आ. स्नेहलता कोल्हे यांनी पालिका निवडणुकांपर्यंत शहराध्यक्षपद कैलास खैरे यांच्याकडे कायम राहील, अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यामुळे, सर्व इच्छुकांना अध्यक्षपदाचे स्वप्न विसरून पालिका निवडणुकांसाठी कार्यरत व्हावे लागणार असे दिसत होते. तरीही शहराध्यक्षदावर नवीन नियुक्ती केली जावी, अशी मागणी दबक्या आवाजात सुरू होती . पक्ष नेतृत्वाला कल्पना देऊन ही जबाबदारी पक्षाच्या नव्या चेहऱ्याकडे सोपविण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी इच्छुकांची भावना होती. अखेर याची दखल घेऊन भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी माजी नगरसेवक दत्ता काले यांच्या कोपरगाव भाजपा शहराध्यक्ष पदी नियुक्तीला हिरवा कंदील दिला होता .
भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांच्या नियुक्तीवर साई संस्थान विश्वस्त बिपीनदादा कोल्हे, भाजपचे प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कोपरगाव तालुका औद्योगिक वसाहत चेअरमन विवेक कोल्हे, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, अॅडवोकेट रवींद्र बोरावके, गटनेते रवींद्र पाठक, जिल्हा उपाध्यक्ष शरद नाना थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, सर्व नगरसेवक, पदाधिकारी, यांनी त्यांचे अभिनंदन केले. दत्ता काले यांच्या नियुक्तीचे वृत्त समजताच शहरात जल्लोष
- चौकट
कॉलेजमधील सलग तीन वर्षे वेल्फेअर विद्यापीठ प्रतिनिधी (UR) व नगरसेवक गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशी पदे भूषवणारे, संघटन कौशल्य, माणसे जमा करण्याची हातोटी, सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची कला, दांडगा जनसंपर्क, नेतृत्वगुण यामुळे आजपर्यंत ठराविक कक्षेत राहिलेला भाजप आता ऑक्टोपसच्या गतीने घराघरात पोचले शिवाय राहणार नाही. आपण तो घराघरात व तळागाळापर्यंत पोहोचवणार असल्याची ग्वाही भाजपचे नवे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी दिली.