कोपरगावात नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी कोल्हे गटाचे स्वप्नील निखाडे

कोपरगावात नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी कोल्हे गटाचे स्वप्नील निखाडे

वृत्तवेध ऑनलाईन | 21 Oct 2020,
By: Rajendara Salkar 16.30

कोल्हे गटाचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांचा सत्कार करताना विवेक कोल्हे पराग संधान शहराध्यक्ष दत्ता काले व कार्यकर्ते

कोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची आज बुधवारी (२१) रोजी निवडणूक बिनविरोध पार पडली. कोल्हे गटाचे स्वप्निल निखाडे यांची यावेळी बिनविरोध निवड झाल्याचे पिठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी जाहीर केले. ऑनलाइन झालेल्या निवडणूक कामी पिठासीन अधिकारी गोविंद शिंदे यांना मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व उपमुख्य अधिकारी सुनील गोरडे यांनी मदत केली

उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी कोल्हे गटाचे स्वप्निल निखाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडून आले.

गाव नगरपालिकेमध्ये मध्ये एकुण २८ सदस्य संख्या असुन कोल्हे गट (१४) शिवसेना (६), राष्ट्रवादी काॅग्रेस, (७) अपक्ष एक सदस्य संख्या आहे. नगराध्यक्ष विजय वहाडणे हे अपक्ष असुन ते जनतेमधून निवडून आलेले आहेत.

कोकमठाण गावचे सुपुत्र ,रामदासी बाबा भक्त मंडळाचे सदस्य व भारतीय जनता पार्टीचे सर्वात कमी वयाचे नगरसेवक स्वप्निल निखाडे यांची युवक नेते विवेक कोल्हे यांच्या आदेशाने ‘उपनगराध्यक्ष’ पदी निवड करण्यात आली त्यांचा संजीवनी कार्यस्थळावर आजी-माजी नगरसेवकांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला निवडीनंतर बोलताना निखाडे म्हणाले गेल्या एक महिन्यापासून नगरपालिकेचे थांबलेले कामकाज प्रथमता सुरळीत करण्यावर आपला भर राहील तसेच आपण दोन वेळा पाणीपुरवठा सभापती म्हणून काम केले आहे त्या अनुभवाच्या जोरावर युवा नेते विवेक कोल्हे संजीवनी चे अध्यक्ष बिपिन कोल्हे व माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आपण पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी सत्कार प्रसंगी बोलताना दिली. श्री निखाडे प्रभाग क्रमांक दहा मधून निवडून आले आहेत मेकॅनिकल डिप्लोमा झालेले निखाडे हे कोल्हे गटातील सर्वात कमी वयाचे नगरसेवक असून कोल्हे पितापुत्रांनी दिलेल्या जबाबदारी ची जाणीव ठेवून हा काटेरी मुकुट डोक्यावर ठेवून कोपरगाव विकासासाठी आपण कटिबद्ध राहणार आहोत. यापुढे सर्वांना बरोबर विश्वासात घेऊन आपण शहर व विविध प्रभागातील विकासात्मक कामासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जो निधी आणला त्याचा वापर करून कामांना प्राधान्य देऊ युवक नेते विवेक कोल्हे यांनी आपणास न्याय दिल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी राजीनामा दिल्यानंतर आगामी उपनगराध्यक्ष कोण होणार याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते मात्र निखाडे यांच्या निवडीने त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे श्री निखाडे यांच्या निवडीनंतर संजीवनी कार्यस्थळावर आजी माजी नगरसेवक भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आदींच्या उपस्थितीत श्री निखाडे यांचा सत्कार करण्यात आला व आगामी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page