कर्मवीर काळे कारखान्याचा ६६ व्या गळीताचा बॉयलर अग्निप्रदीपन साध्या पद्धतीने
वृत्तवेध ऑनलाईन | 21 Oct 2020,
By: Rajendara Salkar 16.00
कोपरगाव : जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर यावर्षी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपनसमारंभ कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अरुणाताई यांच्या हस्ते विधिवत पूजा करून कारखान्याचे मार्गदर्शक व जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
यावर्षी गळीत हंगामावर कोरोनाचे सावट आहे. अशा परिस्थितीत गळीत हंगाम सुरु करणे हे एक आवाहन आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणे गरजेचे आहे. त्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०/२१ या वर्षाच्या ६६ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ साध्या पद्धतीने व मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थित करण्याचा निर्णय आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेवरून कारखाना व्यवस्थापनाने घेतला होता. त्यानुसार हा कार्यक्रम संचालक मंडळ व कारखाना अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. वर्क्स मॅनेजर दौलतराव चव्हाण, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चिफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे आदी मान्यवर सोशल डिस्टनसिंग ठेवून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी केले तर संचालक ज्ञानदेव मांजरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.