भंडारा जिल्हा रुग्णालयात भीषण आग, १० अर्भकांचा मृत्यू; चौकशी व दोषींवर कारवाई करावी भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांची मागणी
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 9Jan 2021, 17:40:00
कोपरगाव : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) भीषण आग लागल्याने या आगीत दहा अर्भकांचा मृत्यू झाला आहे. धुरामुळे गुदमरून या अर्भकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल भा.ज.पा प्रदेश सचिव माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे .झालेल्या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. व भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी सरकारने प्रयत्न देखील केले पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
शनिवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले. या युनिटमध्ये एकूण सतरा अर्भके होती.
केले. या SNCU मध्ये आऊटबॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी आऊट बॉर्न युनिटमधील १० अर्भकांचा होरपळून मृत्यू झाला.मृत्युमुखी पडलेली अर्भके एक ते तीन महिने या वयोगटातील आहेत. बचावकार्यात मॉनिटरमध्ये असलेल्या सात अर्भकांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.
ज्या सात बालकांचे प्राण हॉस्पिटलमधील परिचारिका व कर्मचाऱ्यांनी वाचविले त्यांचेही त्यांनी आभार मानले व या घटनेत मृत्यू पावलेल्या बालकांच्या कुटुंबीय यांच्या दुःखात संजीवनी उद्योग समूह कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्व नागरिक सहभागी असल्याच्या दुःखद भावना सौ. कोल्हे यावेळी व्यक्त केल्या.