कोपरगाव ओगदीत दरोडा : महिला जखमी करून , रोकड दागिने ३ लाख १८ हजार लुटले
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 9Jan 2021, 16:30:00
कोपरगाव : तालुक्यातील ओगदी येथील एका शेतकऱ्यांच्या घरावर शनिवारी (९) रोजी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी घराचा दरवाजा दगडाने तोडले महिलेला जखमी करून घरातील रोकडसह दागिने असा एकूण ३ लाख १८ हजार मुद्देमाल लुटून नेला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,कमलबाई लक्ष्मण जोरवर ह्या आपल्या पती लक्ष्मण तुकाराम जोरवर यांच्या समवेत राहतात. शनिवारी रात्री त्यांचे पती हे शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. जाताना त्यांनी घराला बाहेरून कुलुप लावले होते. त्यांची पत्नी कमलबाई यांनी आतून दार लावून झोपल्या.
रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास तीन दरोडेखोरानी दरवाजाला असलेले कुलूप तोडले. त्यानंतरही दार उघडले नसल्याने दरोडेखोरांनी दार तोडण्यास सुरवात केली. त्यावर आत आलेल्या कमलाबाई जोरजोराने ओरडू लागल्याने दरोडेखोरांनी त्यांना दार उघडण्यास सांगितले. त्यास कमलबाई यांनी विरोध दर्शविला. त्यावर दरोडेखोरानी दगडी पाट्याने दरवाजा तोडूला घरात प्रवेश करून दरोडेखोरांनी घरात एकट्याच असलेल्या कमलबाई लक्ष्मण जोरवर (वय-४५) यांना लाकडी दांड्याने डाव्या हातावर पाठीवर मांडीवर लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून फिर्यादी चा हात फॅक्चर करून जखमी केले .व कपाटातील ५० हजार रुपये रोख रकमेसह २ लाख ६८ हजार किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडेखोरानी लुटून नेला आहे.
याप्रकरणी कमलबाई लक्ष्मण जोरवर रा. घरकाम रा. बोकटे रोड ओगदी तालुका कोपरगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन अज्ञात दरोडेखोराविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.न.व कलम-l 14/2020 भा द वी क 394,397, 457,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे स्वतः या दरोड्याचा तपास करीत आहेत.