स्वर्गीय पत्रकार अशोक खांबेकर यांना मरणोत्तर पत्रकारिता गौरव पुरस्कार
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 10Jan 2021, 14:00:00
कोपरगाव : किराणा मर्चंट असोसिएशनच्यावतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून कोपरगाव शिर्डी, राहता परिसरातील पत्रकारांचा यथोचित सन्मान करीत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर यांना मरणोत्तर पत्रकारिता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पत्नी माजी उपनगराध्यक्ष श्रीमती मीनल खांबेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला, या कार्यक्रम प्रसंगी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ पत्रकार विक्रम भाऊ सारडा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे होते.
स्वागत किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांनी केले,तर परिचय सुधीर डागा यांनी करून दिला. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना विक्रम भाऊ सारडा यांनी काका कोयटे यांच्या विविध कल्पक व सातत्याने विविध उपक्रम राबवत असलेल्या संकल्पनांचे स्वागत केले. कोयटे यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी त्याची खात्री मात्र देता येत नसल्याचे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले. सूत्रसंचालन राम थोरे यांनी केले याप्रसंगी राजेंद्र सालकर यांचे भाषण झाले आभार नगरसेवक सत्येन मुंदडा यांनी मानले.