शब्दगंध शाखेतून उद्याचे समृध्द साहित्यिक निर्माण होतील-सौ. ऐश्वर्या सातभाई     

शब्दगंध शाखेतून उद्याचे समृध्द साहित्यिक निर्माण होतील-सौ. ऐश्वर्या सातभाई

Shabdagandh branch will produce rich literature of tomorrow. Aishwarya Satbhai

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 12Jan 2021, 16:00:00

कोपरंगाव : कोपरगाव तालुक्याची  भुमी ऐतिहासिक धार्मिक पौराणिक असून येथे अनेक साहित्यिक  लेखक, कवी येथे राहून गेले,नव्या जुन्या साहित्यिकांचा मेळ घालुन तालुकास्तरावर शब्दगंध ने सुरू केलेली शाखा नवोदितांना पाठबळ देईल, भविष्यात नवोदिताना मार्गदर्शक ठरतील असे उपक्रम सुरू केल्यास अनेकांना त्यातून संधी मिळेल. त्यातुनच उद्याचे समृध्द साहित्यिक निर्माण होतील असे मत माजी नगराध्यक्ष सौ.ऐश्वर्या सातभाई यांनी केले .

येथील हिंदी वाचनालयात शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या तालुका कार्यकारिणीच्या स्थापना प्रसंगी अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या,यावेळी शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी, उपाध्यक्ष कवी सुभाष सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फंड, रवींद्र धस आदी मान्यवर उपस्थितीत होते. 

सुनील गोसावी म्हणाले कि, आपल्या मनातील भाव भावना कागदावर उतरवल्या तर  कथा ,कविता तयार होतात,त्या समाजासमोर येण्यासाठी अश्या विचारपीठांची आवश्यकता असते,शब्दगंध ची येथील नवे संघटन ती पुर्ण करेल.

    यावेळी सुभाष सोनवणे,राजेंद्र फंड,सुधीर कोयटे,सौ.वंदना चिकटे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.कोपरंगाव तालुका शाखा कार्यकारिणीची पुढीलप्रमाणे जाहिर करण्यात आली,

अध्यक्ष – कैलास साळगट,उपाध्यक्ष सौ.ऐश्वर्या सातभाई व सुधीर कोयटे
कार्याध्यक्ष – प्रा.डॉ.संजय दवंगे,सह कार्याध्यक्ष – संदीप बागल,सचिव – प्रा.मधुमीता निळेकर,सह सचिव – सौ.वंदना चिकटे, खजिनदार – प्रमोद येवले,सल्लागार – भानुदास बैरागी व राम गायकवाड,पद्माकांत कुदळे,
कार्यकारणी सदस्य – अशोक आव्हाटे, शैलजा रोहम,श्रीकांत बागुल, नंदकिशोर लांडगे,स्वाती मुळे,श्वेतांबरी राऊत, हेमचंद्र भवर,रविंद्र कांबळे यावेळी छोटेखानी  कविसंमेलन झाले,शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने ग्रंथालयास पुस्तके भेट देण्यात आली. प्रास्ताविक कैलास साळगट यांनी केले तर  प्रमोद येवले यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page