सौ. मनाली कोल्हे यांच्या संकल्पनेतून ४५० विद्यार्थ्यांची रिडेथाॅन स्पर्धा संपन्न
With the concept of Mrs. Manali Kolhe, a redemption competition of 450 students was held
कोपरगांव: संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांच्या संकल्पनेतुन संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या वतीने नाविण्यपुर्ण उपक्रम मालिके अंतर्गत कोपरगांव, राहाता व येवला तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रिडेथाॅन २०२०-२१ या वाचन व कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना स्वतःच्या कथनाचा व्हीडिओ तयार करता येवुन वकृत्व कला विकसीत व्हावी व सध्याच्या काळात दुरभाष्य प्रणालीचा वापर करता यावा, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात तीन गटात सुमारे ४५० पेक्षा अधिक मुला-मुलींनी सहभाग नोंदविला आणि त्यांच्यातील सुप्त गुणांची उधळण केली. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी प्रथम आनलाईन रागी रजिस्ट्रेशन केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आवडीचे पुस्तक वाचायचे होते. पुस्तक वाचल्यानंतर काय वाचले यांचे कथा कथन करून त्याचा व्हीडिओ तयार करून तो संजीवनी अकॅडमीकडे ऑनलाईन पाठवायचा होता. कथाकथन करताना अनेक विध्यार्थ्यानी त्यांच्या कथेशी निगडीत वेशभूषा करून देखावेही सादर केले. परीक्षकांनी तीन गटांचे व्हीडीओ परीक्षण केले आणि प्रत्येक गटातुन सात विजयी विद्यार्थी निवडले. दूरभाष्य प्रणालीच्या माध्यमातुन मनाली कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुण्या म्हणुन साईनाथ हाॅस्पिटल, शिर्डीच्या डाॅ. मधुरा जोशी आणि प्राचार्य सौ. सुंदरी सुब्रमण्यम व संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डीच्या प्राचार्या सौ.रचना कामत यांच्या उपस्थितीत बक्षिस वितरणाचा कार्यक्रम झाला. यात विजेत्यांची नावे व रोख बक्षिसांची रक्कम घोषित करण्यात आली. नंतर प्रमाणपत्र आणि रोख बक्षिसांची रक्कम विजेत्या विध्यार्थ्यांच्या मुख्याध्यापकांकडे सुपुर्द करण्यात आली. बक्षिस वितरण समारंभात सौ मनाली केाल्हे म्हणाल्या की वाचनाने नवीन बाबींची माहिती वाढून विद्यार्थ्यांचा ज्ञानकोश वाढतो. डाॅ. जोशी यांनी सांगीतले की संजीवनीचा हा उपक्रम अतिशय नाविण्यपुर्ण आहे. या उपक्रमातुन विद्यार्थ्यांमधील विविध गुणांची उकल होवुन भविष्यात आपल्यात दडलेल्या गुणांची यशस्वी जीवनाकडे वाटचाल होण्यासाठी त्यांना निश्चित मदत होईल. पहिल्या तीन क्रमांकाने विजयी विद्यार्थी पुढील प्रमाणे. ग्रेड १- श्लोक अनिल दवंगे, अॅव्होनिका मेहुलकुमार सोलंकी, संहीता अमर नरोडे, ग्रेड २-अर्णव योगेश मोढे, स्वरा कैलास आढाव, जान्हवी अनुप पटेल, ग्रेड ३- राजविका अमित कोल्हे, सुरभी संतोष कोकणे, समन्वी सुनिल शिंदे , ग्रेड ४-विजयालक्ष्मी कृष्णा आढाव, वैष्णवी सचिन भडकवाडे, अथर्व अमोल देवकाते, ग्रेड ५-ओवी निलेश जपे, सई जयंत पांचाल, साची विरेश अग्रवाल, ग्रेड ६-तन्मयी सचिन कडू, शिवेंद्रत्या समिर देशमुख, कनिका सचिन सावंत, ग्रेड ७-अनुष्का प्रितम जपे, आरती अनिल कारवा, अक्षोली अतुल वाघ. माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हेे, कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व विजेते व सहभागी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.